आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीही पत्नी, अपत्य आणि कुटुंबाला दुःखी करून दान करू नये, पुण्य मिळत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि वाईट काळातून मुक्ती मिळू शकते. शास्त्रामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या पुण्य कर्मामुळे सजमात समानतेचे भाव कायम राहतो आणि गरजू व्यक्तीलाही जीवनासाठी उपयोगी वस्तू मिळतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य प्रणयन एम. पाठक यांच्यानुसार जाणून घ्या, दानाशी संबंधित काही खास गोष्टी...


1. जो व्यक्ती आपल्या पत्नी, अपत्य आणि कुटुंबाला दुःखी करून दान देतो, ते दान पुण्य प्रदान करत नाही. दान घरातील सर्व लोकांच्या प्रसन्नतेने करावे.


2. एखाद्या गरिबाच्या घरी जाऊन केलेले दान जास्त शुभ राहते. गरजू व्यक्तीला घरी बोलावून दिले गेलेले दान मध्यम फलदायक मानले गेले आहे.


3. अन्न, जल, घोडा, गाय, वस्त्र, शय्या, छत्र आणि आसन या 8 वस्तूंचे दान आयुष्यभर शुभफळ प्रदान करते. शास्त्र मान्यतेनुसार आत्म्याने देहत्याग केल्यानंतर आत्म्याला जीवनातील पाप आणि पुण्याचे फळ भोगावे लागते. पाप कर्माचे त्रासदायक फळ मिळते. या 8 वस्तूंचे दान मृत्यूनंतरच्या या त्रासातुनही मुक्ती मिळवून देते.


4. एखादा व्यक्ती गाय, ब्राह्मण आणि रुग्णांना दान करत असल्यास त्याला थांबवू नये. असे करणारा व्यक्ती पापाचा भागी होतो.


5. तीळ, कुश, जल आणि तांदूळ या गोष्टी हातामध्ये घेऊन दान करावे. अन्यथा हे दान दैत्यांना प्राप्त होते.


6. दान देणाऱ्या व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला आणि घेणाऱ्याचे मुख उत्तर दिशेला असावे. अशाप्रकारे दान दिल्याने देणाऱ्याचे आयुष्य वाढते आणि घेणाऱ्याचे आयुष्य कमी होत नाही.


7. पितर देवतांना तिळाने तसेच देवतांना तांदुळासोबत दान करावे.

बातम्या आणखी आहेत...