आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा आणि सुख-समृद्धी हवी असल्यास शनिवारी करा श्रीविष्णू आणि लक्ष्मीचा हा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. शनिवार 23 जून रोजी ही एकादशी आहे. महाभारतानुसार, या एकादशीला व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीचे व्रत फळ प्राप्त होते. यामुळे या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार एखाद्या व्यक्तीला संपूर्ण वर्षभर एकादशीला कोणताही उपाय करणे शक्य झाले नसल्यास फक्त निर्जला एकादशीला काही खास उपाय करून अडचणीत मुक्त होऊ शकतात. येथे जाणून घ्या, निर्जला एकादशीच्या दिवशी करण्यात येणारे काही खास उपाय...


1. धन लाभासाठी निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करावी.
2. गायीचे कच्चे दूध (गरम न केलेले)मध्ये केशर मिसळून श्रीविष्णूंचा अभिषेक करावा.
3. एकादशीला दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल भरून श्रीविष्णूंचा अभिषेक करावा.
4. एकादशीला संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावून तुळशीला नमस्कार करावा.
5. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास मानण्यात आला आहे. यामुळे एकादशीला पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करावे.
6. भगवान विष्णूंना पितांबरधारी म्हणतात, यामुळे एकादशीच्या दिवशी यांना पिवळे वस्त्र अर्पण करावेत.
7. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची माळ अर्पण करावी. यामुळे श्रीविष्णू प्रसन्न होतात.

बातम्या आणखी आहेत...