आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या गर्भातच निश्चित होतात बाळाच्या भविष्याशी संबंधित या 5 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या धर्म ग्रंथांमध्ये गूढ रहस्यांशी संबधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्या सर्व लोकांना माहिती नसाव्यात. आज आम्ही तुम्हाला पंचतंत्रमधील हितोपदेशमध्ये सांगण्यात आलेली एक खास गोष्ट सांगत आहोत. पं. विष्णु शर्मा द्वारा रचित या ग्रंथानुसार, जेव्हा एखादे बाळ आईच्या गर्भामध्ये असते तेव्हाच देवता त्याच्या आयुष्याशी संबंधित 5 गोष्टी निश्चित करतात. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या 5 गोष्टी.


श्लोक
आयु: कर्म च वित्तंच विद्या निधनमेव च।
पंचैतान्यपि सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिन:।।

अर्थ- विधात्याद्वारे आयु, कर्म, धन-संपत्ती, शास्त्रांचे ज्ञान आणि मृत्यू या 5 गोष्टी जीव आईच्या गर्भामध्ये असतानाच निश्चित केल्या जातात.


1. आयु
आईच्या गर्भातच शिशूचे आयुष्य निर्धारित होते. म्हणजेच तो वयाच्या किती वर्षापर्यंत जिवंत राहणार.


2. कर्म (काम)
योग्य झाल्यानंतर शिशु कोणकोणते काम करणार म्हणजेच कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करणार. बिझनेस करणार की नोकरी. या गोष्टीही आईच्या गर्भातच निश्चित होतात.


3. धन-संपत्ती
गर्भस्थ शिशु जन्म घेतल्यानंतर किती धन-संपत्तीचा मालक होणार. धन-संपत्तीचे सुख मिळणार की नाही. स्वतः धन मिळवणार की वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ घेणार. या गोष्टीसुद्धा परमात्मा आधीच निश्चित करतो.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टींविषयी...

बातम्या आणखी आहेत...