आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या देवता आणि ग्रहाच्या कृपेसाठी हातामध्ये कोणता धागा बांधावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातामध्ये रंगीबेरंगी धागे (दोरे) बांधण्याची सध्या एक फॅशन आहे. सामान्यतः मंदिरांमध्ये हातावर धागे-दोरे बांधले जातात. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, हे धागे-दोरे आपल्यामध्ये सकारत्मक ऊर्जाही निर्माण करतात. हातामध्ये बांधलेला धागा आपल्या इष्टदेवतेनुसार किंवा अडचणीनुसार बांधल्यास याचे शुभप्रभाव दिसू लागतात. परंतु लोक योग्य विचार न करता कोणत्याही प्रकारचा धागा हातावर बांधून घेतात. याला रक्षासूत्र असे म्हणतात आणि हे बांधण्यासाठी एक विशिष्ठ पद्धत सांगण्यात आली आहे.


आपल्या शास्त्रांमध्ये याविषयी संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे. ज्योतिषमध्ये रक्षासूत्रचे खास महत्त्व सांगण्यात आले आहे. कोणत्याही पूजेपूर्वी पुरोहित पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या हातावर रक्षासूत्र विशेष मंत्र उच्चाराने बांधतात. प्रत्येक देवता आणि ग्रहावर वेगवेगळ्या रंगाचा धागा (दोरा) बांधण्याचे विधान आहे. 


शनि - शनिदेवाच्या कृपेसाठी निळ्या रंगाचा सुती धागा बांधवा.


बुध - बुध ग्रहाच्या शुभफळासाठी हिरव्या रंगाचा धागा बांधवा.


गुरु आणि श्रीविष्णू - गुरु बृहस्पती आणि श्रीविष्णू यांच्या कृपेसाठी हातामध्ये पिवळ्या रंगाचा रेशमी धागा बांधावा.


शुक्र आणि लक्ष्मी - देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाच्या शुभफळासाठी हातामध्ये पांढरा रेशमी धागा बांधवा.


चंद्र आणि शिव - शिव कृपा आणि चंद्राच्या शुभ प्रभावासाठी हातामध्ये पांढरा धागा बांधावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कशाप्रकारे हातामध्ये धागा बांधावा...

बातम्या आणखी आहेत...