आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 10 काम करत राहिल्यास शनिदेव दूर करू शकतात तुमची प्रत्येक बाधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये एकूण नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू सांगण्यात आले आहेत. या नऊ ग्रहांमध्ये शनिदेवाला क्रूर मानले जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा-पाठ करण्यासोबतच इतरही काही शुभ काम करत राहणे आवश्यक आहे. जो व्यक्ती गरिबांची मदत करतो त्याच्यावर शनिदेवाची विशेष कृपा राहते आणि प्रत्येक बाधा दूर होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार येथे जाणून घ्या, शनिदेव कोणकोणत्या कामामुळे प्रसन्न होतात.


1. वेळोवेळी गरिबांना काळे तीळ आणि तेलाचे दान करावे. काळे हरभरे, काळी उडीद आणि काळे कपडेही दान करावेत.


2. पाऊस आणि उन्हापासून रक्षण व्हावे यासाठी एखाद्या ब्राह्मणाला छत्री दान करावी.


3. रोज सकाळ-संध्याकाळ स्वयंपाकातील शेवटची पोळी श्वानाला खाऊ घालावी.


4. एखाद्या अंध व्यक्तीची मदत करावी. शक्य असल्यास अंध व्यक्तीच्या औषधांचा खर्च उचलावा.


5. प्रत्येक शनिवारी शनीसाठी व्रत ठेवावे. एखाद्या भंडाऱ्यात अन्नदान करावे.


6. मांसाहार आणि नशेपासून दूर राहावे. रोज सकाळी माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात.


7. प्रत्येक शनिवारी स्नानाच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून स्नान करावे.


8. एखाद्या स्वच्छता कर्मचाऱ्याला नवीन कपडे दान करावेत.


9. कधीही आई-वडील, गरीब व्यक्ती, ब्राह्मण किंवा कुटुंबातील लोकांचे मन दुखावू नये.


10. एखाद्या मंदिरात पिंपळाचे झाड लावून त्याची निगा राखावी.

बातम्या आणखी आहेत...