आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीमध्ये भक्तांना भिंतीवर दिसले साईबाबा, सोशल मीडियावरील बाबांचा हा व्हायरल फोटो मानला जात आहे खरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डीतील साईबाबा मंदिरात भक्तांनी दावा केला आहे की, बुधवार 11 जुलैच्या रात्री मंदिराच्या एक भिंतीवर साईबाबांनी साक्षात दर्शन दिले. मंदिरात उपस्थित असलेले भक्त सांगत आहेत की, त्यांनी द्वारकामाई मंदिराच्या भिंतीवर साईबाबांना पाहिले. या बातमीनंतर मंदिरात भक्तांची गर्दी वाढली आहे. भक्त हा बाबांचा चमत्कार मानत आहेत. सोशल मीडियावर साईबाबांचा हा फोटो व्हायरल होत असून यामधील काही फोटोंविषयी सांगितले जात आहे की, बाबांचे हे खरे फोटो आहेत. येथे पाहा, शिर्डीच्या साईबाबांचे काही दुर्लभ फोटो....


आध्यात्मिक गुरु होते साईबाबा 
> शिर्डीतील साईबाबांचे भक्त जगभरात आहेत. साईबाबांच्या चमत्काराच्या कथा सर्वदूर प्रचलित आहे. सर्व भक्त साईबाबांचे फोटो घरात अवश्य लावतात.

> साईबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये व्यतीत केले. ते नेहमी इतरांचे दुःख दूर करत राहिले.

> बाबांचा जन्म कुठे आणि केव्हा झाला, याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही.

> साईबाबांचा मूळमंत्र श्रद्धा आणि सबुरी आहे.

> आपणही जीवनात श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास जीवनातील दुःख दूर होऊन आपण सुखी आणि यशस्वी होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...