आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीसूक्तचा पाठ केल्याने दूर होऊ शकते गरिबी, प्रत्येक शुक्रवारी या विधीनुसार करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार, धनलाभासाठी देवी लक्ष्मीची पूजा करणे श्रेष्ठ उपाय आहे. धनाच्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र आणि स्तुतीची रचना करण्यात आली आहे. यामधीलच एक आहे श्रीसूक्त. उज्जैनचे ज्योतिषाचार्य  पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार श्रीसूक्ताचे वर्णन ऋग्वेदामध्ये आढळून येते. श्रसूक्तमध्ये सोळा मंत्र आहेत.


या सूक्तचा पाठ पूर्ण श्रद्धेने केल्यास देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होऊन साधकाला धन-संपत्ती प्रदान करते. हा पाठ रोज करणे उत्तम राहते परंतु हे शक्य नसल्यास प्रत्येक शुक्रवारी हा पाठ करू शकता. येथे जाणून घ्या, विधी...


1. शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून रेशमी लाल कपड्यावर देवी लक्ष्मी कमळावर बसलेली मूर्ती स्थापित करावी.


2. त्यानंतर देवी लक्ष्मीला लाल फुल आणि पूजेची इतर सामग्री उदा. चंदन, अबीर, गुलाल, अक्षता अर्पण कराव्यात. खीरचा नैवेद्य दाखवावा.


3. त्यानंतर श्रीसूक्तचा पाठ करावा. देवी लक्ष्मी आरती करावी.


4. प्रत्येक शुक्रवारी या विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा करणे शक्य नसल्यास, प्रत्येक महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला हा उपाय केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...