आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीसमोर करा खीरचा हा उपाय, नष्ट होऊ शकते घरातील दरिद्रता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 15 जून रोजी सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी हा योग शुभ मानला जातो. या दिवशी करण्यात आलेले काम सिद्ध म्हणजेच यशस्वी होतात. शुक्रवारी हा योग जुळून आल्यामुळे गरिबी दूर करण्यासाठी खास उपाय केले जाऊ शकतात. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिषाचार्य  पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, आज कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


शुक्रवारचा कारक ग्रह आहे शुक्र 
ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारचा कारक ग्रह शुक्र आहे. हा ग्रह ऐश्वर्य, सुख-सुविधा आणि वैवाहिक जीवनाला प्रभावित करतो. या ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी शुक्र ग्रहासाठी विशेष उपाय करावेत.


शुक्रवार आणि सर्वार्थ सिद्धी योगामध्ये करू शकता हे 5 उपाय
1. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी महालक्ष्मीची विधिव्रत पूजा करणे आवश्यक आहे. दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करून लक्ष्मीला खीर नैवेद्य दाखवावी. देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची पूजा करावी.

2. प्रत्येक शुक्रवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.

3. शुक्रवारी एखद्या मंदिरात जाऊन तीन झाडू दान करावे. हा उपाय कोणालाही न सांगता करावा.

4. देवी लक्ष्मीची विधीनुसार पूजा करावी आणि पूजेमध्ये दक्षिणावर्ती शंख आणि तांदूळ ठेवावेत. पूजेनंतर या सर्व वस्तू तिजोरीत ठेवाव्यात.

5. शुक्रवारी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. उदा. दूध, खीर मिठाईचे दान करावे.

बातम्या आणखी आहेत...