आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणपणात या 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहा, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळामध्ये अनेक लोक सर्व प्रकारच्या सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी मानवी मूल्यांकडे दुर्लक्ष करून आपला स्वार्थ साध्य करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. परंतु अशा व्यवहाराचा आणि स्वभावाचा वाईट प्रभाव चुकीच्या पद्धतीने कोणत्या न कोणत्या रुपात पुढील पिढीपर्यंत पोहचत आहे. विशेषतः तरुण मुलांच्या विचारांना संस्कार, कष्ट किंवा योग्य ज्ञानाकडे वळवले नाही तर सुख-सुविधांच्या या जाळ्यात सर्वकाही लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळवण्याच्या प्रयत्नात कोणताही तरुण वाईट सवयी आणि विचारांचा शिकार होऊ शकतो. यामुळे त्याच्या पदरी अपयश पडते आणि त्याला जीवन जगणे कठीण दिसू लागते.


क्रोध - आजच्या तरुणाईत सर्वाधिक कमतरता सहनशीलतेची असल्याचे दिसते. क्रोध   आपल्याला नव्हे आपल्या व्यक्तिमत्त्वाला जाळतो. क्षणिक आवेगात येऊन माणूस अशा चुका करतो की त्यासाठी त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. क्रोध एका क्षणात उफाळून येतो आणि दुस-याच क्षणाला नष्टही होतो. परंतु कधी कधी हा क्षणभरासाठी आलेला क्रोध आयुष्याचे नुकसान करून जातो. धैर्यवान मनुष्य क्रोधाला डोके वर काढू देत नाही. आपल्या क्रोधी स्वभावावर विजय मिळवण्यासाठी धैर्य एक समर्थ आणि सबळ शस्त्र आहे.

 

महाभारतामध्ये सांगण्यात आले आहे की...
अक्रोधने जयेत् क्रोध म्हणजे क्रोध न करण्याचा संकल्पच क्रोधावर नियंत्रणाचा उपाय आहे.


यशस्वी जीवनासाठी तरुणांनी कोणत्या इतर कोणत्या 2 गोष्टीना स्वतःपासून दूरू ठेवावे हे जाणून घ्या...

बातम्या आणखी आहेत...