आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वस्तू, रस्त्यावर पडलेल्या दिसल्यास यापासून दूरच राहावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यावरून चालताना विविध प्रकारच्या वस्तू दृष्टीस पडतात. या वस्तूंमध्ये काही अशुभ आणि नुकसानदायक गोष्टी असू शकतात. येथे अशुभ मानल्या जाणाऱ्या 6 गोष्टींबद्दल सांगण्यात येत आहे. या गोष्टी रस्त्यावर दिसल्यास त्यापासून दुरून निघून जावे. या अशुभ गोष्टींजवळ जाऊ नये. या गोष्टींपासून दूर न राहिल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते तसेच आपली पवित्रतासुद्धा नष्ट होते. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या 6 गोष्टींपासून दूर राहावे.


या ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे या 6 अशुभ गोष्टींबद्दल
धर्म शास्त्रामध्ये एकूण 18 पुराण सांगण्यात आले असून यामधील विष्णु पुराण एक आहे. या पुराणामध्ये सुख-समृद्धी आणि पवित्रता कायम ठेवण्यासाठी विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णु तसेच लक्ष्मीसहित इतर सर्व देवतांची कृपा प्राप्त होते. विष्णु पुराणामध्ये रस्त्यावरून चालताना कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे या संदर्भात सांगण्यात आले आहे. या गोष्टींपासून दूर न राहिल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते तसेच आपली पवित्रतासुद्धा नष्ट होते. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या 6 गोष्टींपासून दूर राहावे.


तंत्र-मंत्रच्या वस्तू
आपल्या येथे आजही दृष्ट काढणे किंवा वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी तंत्र-मंत्र क्रिया केल्या जातात. यामध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. काम झाल्यानंतर या वस्तू चौंकामध्ये किंवा रस्त्यावर फेकून दिल्या जातात. उदा. मिरची, लिंबू, अंडे, भोपळा, कुंकू इ. रस्त्यावरून चालताना अशा गोष्टी दिल्यास त्यापासून दूरच राहावे.


अस्थि म्हणजेच हाड
रस्त्यावर अपघात होत राहतात आणि या अपघातांमध्ये अनेकदा प्राणी (उदा. कुत्रा, मांजर, साप) मृत्युमुखी पडतात. यामुळे मृत प्राण्याची हाडे रोडवरच पसरलेली असतात, यापासून दूर होऊन रस्ता पार करावा. हाडांच्या संपर्कात आल्यानंतर स्नान करणे अत्यंत आवश्यक असते. शास्त्रानुसार मृत जीवाच्या संपर्कात आल्यानंतर आपण अपवित्र होतो. यामुळे एखाद्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्यानंतर स्नान करणे आवश्यक सांगण्यात आले आहे.


केश म्हणजेच केस
अनेकवेळा आपल्याला रस्त्यावरून चालताना एखाद्या व्यक्तीचे तुटलेले केस दिसतात. तुटलेल्या केसांना अपवित्र मानले जाते. रस्त्यावर पडलेल्या केसांपासून दूर राहावे. या केसांना ओलांडून पुढे जाऊ नये. जेवणामध्ये केस निघाल्यास ते संपूर्ण अन्न अपवित्र होते.


पुढे जाणून घ्या, 3 गोष्टींबद्दल...

बातम्या आणखी आहेत...