Home | Jeevan Mantra | Dharm | Tuesday Hanuman Mantra for happy life

प्रत्येक समस्येसाठी आहे वेगवेगळा मंत्र, मंगळवारी हनुमान पूजेनंतर करावा जप

रिलिजन डेस्क | Update - Jul 24, 2018, 12:02 AM IST

मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेतल्याने प्रत्येक समस्या दूर होऊ शकते. गीताप्रेस गोरखपूरच्या हनुमान अंकामध्ये विविध मंत्रांविष

 • Tuesday Hanuman Mantra for happy life

  मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेतल्याने प्रत्येक समस्या दूर होऊ शकते. गीताप्रेस गोरखपूरच्या हनुमान अंकामध्ये विविध मंत्रांविषयी सांगण्यात आले आहे. वेगवेगळ्या अडचणीसाठी विभिन्न हनुमान मंत्रांचा जप करावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार मंगळवारी हनुमानाची पूजा केल्यानंतर काही खास मंत्रांचा जप केल्यास प्रत्येक समस्या दूर होऊ शकते. येथे जाणून घ्या, समस्येनुसार काही हनुमान मंत्र...


  1. जीवनात एखाद्या प्रकारची भीती असल्यास या मंत्राचा जप करावा -
  हं हनुमंते नम:


  2. दृष्ट लागली असेल तर या मंत्राचा जप करावा -
  हनुमन्नंजनी सुनो वायुपुत्र महाबल:।
  अकस्मादागतोत्पांत नाशयाशु नमोस्तुते।।


  3. एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा जप करावा -
  ऊं हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट।


  4. कर्जामुळे त्रस्त असाल तर या मंत्राचा जप करावा -
  ऊं नमो हनुमते आवेशाय आवेशाय स्वाहा।


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंत्र जपाचे नियम...

 • Tuesday Hanuman Mantra for happy life

  1. मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून एका लाल कपड्यावर हनुमान मूर्ती किंवा फोटो शापित करा.


  2. हनुमानाची पूजा करून गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिवा जप पूर्ण होईपर्यंत चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.

 • Tuesday Hanuman Mantra for happy life

  3. त्यानंतर पहिल्या स्लाईडवर सांगण्यात आलेल्या कोणत्याही एक मंत्राचा जप सुरु करावा. रुद्राक्षाच्या माळेने कमीत कमी 5 माळ जप अवश्य करावा.

Trending