आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे वसंत पंचमीला केली जाते देवी सरस्वतीची पूजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माघ मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमीचे पर्व मानले जाते. यादिवशी ज्ञानदेवता म्हणजे माता सरस्वतीची पूजा केली जाते. येत्या 22 जानेवारी रोजी, सोमवारी वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. हे पर्व साजरे करण्यामागे अनेक धार्मिक कथा आहे. त्यापैकी एक अशी आहे -


पुराण कथेतील मान्यतेनुसार, ज्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान विष्णुच्या आज्ञानुसार सृष्टिची रचना केली. त्यानंतर मनुष्याची रचना केली. पण, मनुष्याच्या रचना केल्यानंतर ब्रह्मदेवला काहीतरी कमतरता राहिल्याचे जाणवले, मनुष्याची रचना केल्यानंतर देखील सगळीकडे मौन (शांती) पसरली आहे असे ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. यानंतर भगवान ब्रह्मदेवाने विष्णुंची अनुमति घेवून एका चर्तुभुजी स्त्रीची रचना केली, जिच्या एका हातात वीणा तर दुसरा हात वर मुद्रेत होता. इतर दोन्ही हातांमध्ये पुस्तक आणि माळा होत्या. यानंतर ब्रह्मदेवाने देवीला वीणा वाजवण्याची विनंती केली. जसे देवीने वीणा वाजवण्यास सुरूवात केली तसे संसारातील सर्व जीव-जतुंना वाणी प्राप्त झाली. तेव्हापासून ब्रह्माने त्या देवीला वाणी देवी सरस्वती असे संबोधले.

बातम्या आणखी आहेत...