आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौर्णिमा : विवाहित महिला वडाच्या झाडालाच का गुंडाळतात सूत ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. पंचांगानुसार उद्या (27 जून, बुधवार) वटपौर्णिमा आहे. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे.


वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील पूर्वपीठिका :
यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली.


व्रताची देवता : सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे.


वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व :
वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.


पुढे वाचा, वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व....

बातम्या आणखी आहेत...