Home | Jeevan Mantra | Dharm | Vijaya Parvati pradosh vrat puja vidhi

आज महादेव आणि पार्वतीचे हे सोपे उपाय केल्यास नष्ट होऊ शकतो वाईट काळ

रिलिजन डेस्क | Update - Jul 25, 2018, 11:19 AM IST

आज (25 जुलै, बुधवार) विजया पार्वती व्रत आहे. यासोबतच आज प्रदोष व्रतही केले जाईल. विजया पार्वती व्रत देवी पार्वतीला समर्प

 • Vijaya Parvati pradosh vrat puja vidhi

  आज (25 जुलै, बुधवार) विजया पार्वती व्रत आहे. यासोबतच आज प्रदोष व्रतही केले जाईल. विजया पार्वती व्रत देवी पार्वतीला समर्पित आहे तर प्रदोष व्रत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास देवी पार्वती आणि भगवान शिव दोघांचीही कृपा प्राप्त होऊ शकते. या उपायांनी दुर्भाग्य दूर होते आणि सौभाग्य वाढते.


  महादेवाला प्रसन्न करण्याचा उपाय
  1. शिवलिंगावर 1-1 करून 21 बेलाची पाने ऊं नमः शिवाय मंत्राचा उच्चार करत अर्पण करावेत.
  2. धनलाभासाठी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करावेत.
  3. चांगल्या आरोग्यासाठी शिवलिंगाचा गायीच्या तुपाने अभिषेक करावा.
  4. शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक केल्यास सर्व ग्रहांचे दोष दूर होतात.


  देवी पार्वतीला प्रसन्न करण्याचे उपाय-
  1. देवी पार्वतीसोबत महादेवाची पूजा केल्यास पती-पत्नीमधील प्रेम वाढते.
  2. 25 जुलैला सकाळी स्नान केल्यानंतर देवी पार्वतीची पूजा करावी आणि या दिवशी व्रतही ठेवावे. संध्याकाळी देवीला खीर नैवेद्य दाखवावी. याच प्रसादाने व्रत सोडावे. यामुळे देवी प्रसन्न होते.
  3. देवी पार्वतीला लाल बांगड्या, कुंकू आणि सौभाग्य सामग्री अर्पण केल्याने सौभाग्य वाढते.

Trending