Home | Jeevan Mantra | Dharm | vinayak chaturthi How To Worship To Lord Ganesh

सोमवारी खास तिथी, श्रीगणेश आणि महादेवासमोर करा हे उपाय, वाढेल सुख-समृद्धी

रिलिजन डेस्क | Update - Jul 16, 2018, 10:18 AM IST

सोमवार 16 जुलैला चतुर्थी आहे. पंचांगानुसार, शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.

 • vinayak chaturthi How To Worship To Lord Ganesh

  सोमवार 16 जुलैला चतुर्थी आहे. पंचांगानुसार, शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा केली जाते. व्रत ठेवले जाते. यावेळी या सोमवारी ही तिथी असल्यामूळे श्रीगणेश तसेच महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि चंद्र ग्रहाचे डोह दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जाऊ शकतात. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, घराची सुख-समृद्धी वाढवणारे आणि धनलाभ करून देणारे काही खास उपाय...


  शिवलिंग पूजेचे उपाय
  - सोमवार आणि चतुर्थी योगामध्ये शिवलिंगावर चांदीच्या कलशाने केशर मिश्रित दूध अर्पण करावे.


  - पंचामृत अर्पण करावे. ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करत बेलाची पाने अर्पण करावीत.


  - या उपायाने महादेव प्रसन्न होतात आणि चंद्र ग्रहाचे दोषही दूर होऊ शकतात.


  - शिव पूजेपूर्वी गणेश पूजन अवश्य करावे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्रीगणेश पूजा उपाय...

 • vinayak chaturthi How To Worship To Lord Ganesh

  # या दिवशी करावी श्रीगणेश पूजा, हा आहे सामान्य विधी 
  > सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर घरामध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती स्थापित करावी. श्रीगणेशाची पूजा करावी.

  > गणेश मंत्र (ऊं गं गणपतयै नम:) उच्चार करत 21 दूर्वा अर्पण कराव्यात.

  > मोदक किंवा बुंदीच्या 21 लाडूंचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर प्रसाद भक्तांना वाटावा.

  > पूजेमध्ये श्रीगणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा संकटनाशक स्तोत्राचे पाठ करावेत. तुम्ही श्रीगणेशाच्या 12 नावांचे स्मरणही करू शकता.

  > घरामध्ये ब्राह्मणांना जेवू घालून दक्षिणा द्यावी.

 • vinayak chaturthi How To Worship To Lord Ganesh

  # श्रीगणेशाच्या 12 नाम मंत्राचा जप करावा 
  > या चतुर्थीला श्रीगणेशाची पूजा करावी आणि त्यांच्या 12 खास नाम मंत्रांचा 108 वेळेस जप करावा. हे आहेत 12 नाम मंत्र-  ऊँ सुमुखाय नम:, ऊँ एकदंताय नम:, ऊँ कपिलाय नम:, ऊँ गजकर्णाय नम:, ऊँ लंबोदराय नम:, ऊँ विकटाय नम:, ऊँ विघ्ननाशाय नम:, ऊँ विनायकाय नम:, ऊँ धूम्रकेतवे नम:, ऊँ गणाध्यक्षाय नम:, ऊँ भालचंद्राय नम:, ऊँ गजाननाय नम:।

  > या नाम मंत्रांचा जप आणि गणेश पूजा झाल्यानंतर प्रसाद भक्तांना वाटावा. श्रीगणेशाकडे दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.

Trending