आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री हे 4 काम केल्यास झोप लागेल चांगली आणि दूर होऊ शकते दुर्भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक मानसिक तणाव, वाईट स्वप्न आणि अनामिक भीतीमुळे रात्री योग्यप्रकारे झोपू शकत नाहीत. तणाव दूर करण्यासाठी व्यक्तीने रोज थोडावेळ मेडिटेशन करावे. या व्यतिरिक्त भीती आणि वाईट स्वप्नापासून दूर राहण्यासाठी ज्योतिषचे उपाय केल्यास लाभ होईल. प्राचीन परंपरेनुसार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक वेळेसाठी काही शुभ काम सांगण्यात आले आहेत. वेळेनुसार योग्य काम केल्यास देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते आणि दुर्भाग्य दूर होते.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार रात्री झोपण्यापूर्वी 4 शुभ काम केल्यास मनातील भीती दूर होते आणि झोपही चांगली लागते.


1. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा 
रात्री झोपण्यापूर्वी खोलीमध्ये तिळाच्या तिलाच दिवा लावल्याने वातावरणातील आणि आपल्या विचारातील नकारात्मकता नष्ट होते. नकारत्मक विचारांमुळेच वाईट स्वप्न पडतात आणि मनात भीती राहते.


2. हनुमान चालीसाचा पाठ करावा 
हनुमान कलियुगातील सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. यांच्या पूजेने सर्वप्रकारचे भय दूर होते आणि नकारात्मकतेपासून रक्षण मिळते. झोपण्यापूर्वी हनुमान चालीसाचे पाठ केल्यास वाईट स्वप्न पडत नाही आणि देवाच्या कृपेने अडचणी दूर होतात.


3. कापूर जाळावा 
कापूरच्या गंधामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची शक्ती असते. झोपण्यापूर्वी खोलीमध्ये कापूर जाळल्याने वातावरण पवित्र राहते आणि आपले विचार सकारात्मक होतात.


4. मंत्राचा जप करावा 
तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप करू शकता. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असावी. या उपायाने वाईट स्वप्नाची भीती दूर होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...