आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी स्नान केल्यानंतर करा हे 1 काम, घरात वाढेल सुख-समृद्धी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार सकाळची वेळ देवी-देवतांच्या पूजेसाठी सर्वोत्तम राहते. जो व्यक्ती सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण करतो, स्नान करून पूजा-पाठ करतो त्याच्या घरावर देवाची नेहमी कृपा राहते. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, असे एक काम जे रोज सकाळी केल्यास घराची सुख-समृद्धी वाढू शकते.


रोज सकाळी स्नान केल्यानंतर करावे हे एक काम
> ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीच्या पद्म चिन्हांची नियमितपणे पूजा केली जाते, तेथे धन कमी पडत नाही. महालक्ष्मी धनाची देवी असून यांच्या कृपेसाठी रॉक सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीचे चरण चिन्ह काढावेत.

> महालक्ष्मीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. यामुळे देवी लक्ष्मीचे प्रतीक स्वरूप चरण चिन्ह कुंकुवानेच काढावेत. यासोबतच घराचे मेनगेट लाल रंगाच्या फुलांनी सजवावे.

> देवी लक्ष्मीचे चरण चिन्ह फरशीवर दरवाजाच्या बाहेर काढावेत. चरण चिन्ह बाहेरून घरामध्ये येत आहेत अशाप्रकारे काढावे. हा उपाय रोज करावा.


या गोष्टीही लक्षात ठेवा 
> देवी लक्ष्मी स्वच्छता असलेल्या घरामध्येच निवास करते.

> घरामध्ये कलह करू नये. कुटुंबात शांती आणि प्रेम कायम ठेवावे.

> कोणत्याही प्रकारचे अधार्मिक काम करू नये.

> स्वतःचे काम प्रामाणिकपणे करावे.

> आई-वडील आणि घरातील वडीलधारी मंडळींचा अनादर करू नये.

बातम्या आणखी आहेत...