Home | Jeevan Mantra | Dharm | Why We Do Not Get The Full Result Of Worship Says Narad Puran

4 कारण : ज्यामुळे दिवस-रात्र पूजा-पाठ करूनही मिळत नाहीत शुभफळ

रिलिजन डेस्क | Update - Jul 25, 2018, 12:04 AM IST

18 महापुराणांमध्ये नारद महापुराण एक आहे. हे भगवान विष्णूंच्या भक्तीचा ग्रंथ आहे.

 • Why We Do Not Get The Full Result Of Worship Says Narad Puran

  18 महापुराणांमध्ये नारद महापुराण एक आहे. हे भगवान विष्णूंच्या भक्तीचा ग्रंथ आहे. श्रीहरीचे परमभक्त नारदमुनी यांच्यासोबत झालेल्या संवादावर आधारित हे पुराण भक्ती आणि जीवन जगण्यासाठी एक उत्तम ग्रंथ आहे. या पुराणामध्ये नारदमुनींनी जीवन सोपे आणि सुख-समृद्ध करण्यासाठी काही उपाय सांगितले आहे. अनेकवेळा आपण पूजा-पाठ करताना काही चुका करतो. या चुका केवळ पुजेमधील नसतात तर काहीवेळ मानसिक स्थितीमुळेही असे घडते.


  या पुराणामध्ये मनातील असे 4 भाव सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे देवाची पूजा करूनही त्याचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, कोणते 4 भाव मनामध्ये ठेवून पूजा केल्यास त्याचे फळ प्राप्त होत नाही...


  1. लोभ - असे म्हंटले जाते की, पूजा-अर्चना निस्वार्थ भावाने करावी. जो मनुष्य एखाद्या लालसेने किंवा स्वार्थाने देवाची पूजा करतो त्याला अशा पूजेचे कधीही फळ प्राप्त होत नाही. निस्वार्थपणे करण्यात आलेल्या पूजेचे शुभफळ प्राप्त होते. जो व्यक्ती कोणताही स्वार्थ न बाळगता देवाची पूजा करतो त्याला काहीही न मागता देव सर्वकाही सुख देतो.


  2. इतरांच्या सांगण्यावरून - अनेक लोक इतरांनी सांगितले म्हणून किंवा कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन पूजा करतात. मनातून इच्छा नसतात फक्त एखाद्याने सांगितले म्हणून केलेली पूजा निष्फळ होते. अशा पूजेचा मनुष्याला कोणत्याही लाभ होत नाही. यामुळे मनुष्याने मनातून आणि पूर्ण श्रद्धेने देवाची पूजा करावी.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • Why We Do Not Get The Full Result Of Worship Says Narad Puran

  3. अज्ञान - देवाची पूजा करण्यापूर्वी पूजन विधीचे पूर्ण ज्ञान आवश्यक आहे. मनुष्याने अपूर्ण ज्ञाने देवाची पूजा करू नये. देवाच्या पूजन कर्माचे ज्ञान नसताना चुकीच्या पद्धतीने पूजा किंवा हवन केल्यास याचे नकारात्मक प्रभाव पडू शकतात. यामुळे कधीही अपूर्ण ज्ञानाने पूजा करू नये.

 • Why We Do Not Get The Full Result Of Worship Says Narad Puran

  4. भीतीने - अनेक लोक भीतीमुळे देवाची पूजा-अर्चना करतात. मनामध्ये भीती घेऊन करण्यात आलेल्या पूजेचे फळ मिळत नाही. मनुष्याने देवाची पूजा शांत आणि पवित्र मनाने करावी. शांत मनाने करण्यात आलेली पूजा नेहमी यशस्वी होते. अशाप्रकारे पूजा केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

Trending