Home | Jeevan Mantra | Dharm | woman wearing bangles benefits

जाणून घ्या, महिलांनी बांगड्या घालण्यामागचे खास कारण...

रिलिजन डेस्क | Update - Jul 17, 2018, 12:03 PM IST

जवळपास सर्व महिला हातामध्ये बांगड्या घालतात. सामान्यतः बांगड्यांना सौभाग्याचे प्रतिक मानले जाते

 • woman wearing bangles benefits

  जवळपास सर्व महिला हातामध्ये बांगड्या घालतात. सामान्यतः बांगड्यांना सौभाग्याचे प्रतिक मानले जाते परंतु यामागे आणखीही काही गुपित दडलेले आहेत.


  शारीरिकरीत्या महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त नाजूक असतात. महिलांची हाडेही कमजोर असतात. बांगड्या घालण्यामागे स्त्रियांना शारीरिकरीत्या शक्ती प्रदान करण्याचा मुख्य उद्येश आहे. महिलांचे वय जसेजसे वाढत जाते त्यांना विविध प्रकारचे आजार घेरतात आणि शरीर कमजोर होऊ लागते.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, महिलांनी बांगड्या घालण्यामागचे खास कारण...

 • woman wearing bangles benefits

  आयुर्वेदानुसार महिलांना शक्ती प्रदान करण्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने महत्वाची भूमिका पार पडतात. हातांची हाडे मजबूत करण्यात सोन्या-चांदीच्या बांगड्या महत्वाचे काम करतात. या बांगड्यांच्या घर्षणामुळे हातांमध्ये सोन्या-चांदीचे गुण सामावले जातात. आयुर्वेदानुसार सोन्या-चांदीचे भस्म शरीराला बळ प्रदान करते. सोन्या-चांदीच्या घर्षणामुळे शरीराला या धातूंचे तत्व प्राप्त होतात.

 • woman wearing bangles benefits

  ज्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज होतो त्या घरातील वातावरणामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक वातावरण निर्माण होते. अशा घरावर देवी-देवतांची विशेष कृपा राहते.

Trending