आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 जूनपर्यंत लक्ष्मी-श्रीविष्णूंसोबत करा या 5 गोष्टींची पूजा, दूर होईल गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 16 मेपासून 13 जूनपर्यंत अधिक मास राहील. यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना प्रत्येक 3 वर्षानंतर येतो. श्रीमद्भागवत पुराणामध्ये या महिन्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. अधिकमासात धर्म-कर्म करण्याची प्रथा आहे. मान्यतेनुसार या दिवसांमध्ये भागवत कथा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार पुरषोत्तम मासामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.


पहिला उपाय
अचानक धनलाभाची इच्छा असल्यास अधिक मासात रोज सकाळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. यासोबतच पूजेमध्ये दक्षिणावर्ती शंख, पिवळी कवडी, हळकुंड, गोमती चक्र आणि श्रीयंत्र ठेवावे.


दूसरा उपाय
बुधवारी लक्ष्मी-विष्णू पूजेनंतर घराच्या मुख्य दारावर महालक्ष्मीचे चरण चिन्ह लावावेत. चरण चिन्ह घरामध्ये प्रवेश करत असलेले लावावेत. रोज सकाळी या चरणांची पूजा करावी.


तिसरा उपाय 
रोज सकाळी लवकर उठून दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे. स्नान केल्यानंतर तांब्याच्या कलशाने सूर्यदेवाला ऊँ आदित्याय नम: मंत्राचा उच्चार करत अर्घ्य द्यावे.


चौथा उपाय 
देवघराच्या खोलीत बसून दररोज श्रीमद्भागवतचा पाठ करावा. या उपायाने श्रीकृष्णची कृपा प्राप्त होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...