आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 जुलैला शुभ योग : एकादशी व्रतासोबत करावी लक्ष्मी पूजा, दूर होतील आजार आणि पूर्ण होतील सर्व इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या वर्षी हि एकादशी 9 जुलै, रविवारी आहे. धर्म शास्त्रानुसार हे व्रत केल्याने भगवान शंकरासह भगवान विष्णूही प्रसन्न होतात. या एका व्रताचे पुण्य 88 हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याच्या पुण्याएवढे असते. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कम्रेंद्रियांसह मनावर नियंत्रण ठेवण्यास हे व्रत सहायक ठरते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सर्व रोग नष्ट होतात.


व्रत विधी
योगिनी एकदाची व्रत नियमाचे पालन दशमी तिथी (8 जुलै, रविवार)ला रात्रीपासून सुरु करावे. दशमी तिथीला जेवणात तामसिक पदार्थांचे सेवन करू नये आणि पूर्ण ब्रह्मचर्यचे पालन करावे.


एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र होऊन भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर बसून संकल्प घ्या. संकल्प घेताना खालील मंत्राचा उच्चार करा...
मम सकल पापक्षयपूर्वक कुष्ठादिरोग निवृत्तिकामनया योगिन्येकादशीव्रतमहं करिष्ये।


- एकादशीच्या दिवशी उपवास करावा म्हणजेच काहीही खाऊ नये. हे शक्य नसल्यास एकदा फलाहार करावा. 


- त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. (तुम्हाला पूजा करणे शक्य नसल्यास एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यावी)


- श्रीविष्णूने पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर धूप-दीप दाखवून नैवेद्य दाखवावा. विष्णू सहस्त्रनामचा पाठ करावा.


- दिवसभर शांत मनाने देवाचे स्मरण करत राहावे. संध्याकाळी पुन्हा विष्णूंची पूजा करावी.


- रात्री भगवान विष्णूंची कथा ऐकावी. जागरण करावे. या व्रताचे समापन एकादशीला होत नाही तर द्वादशीला सकाळी ब्राह्मणाला अन्नदान आणि दक्षिणा दिल्यांनतर हे व्रत समाप्त होते.


- या विधीनुसार योगिनी एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


योगिनी एकादशीच्या दिवशी करा हा उपाय
एकादशी तिथीला लक्ष्मी-विष्णू मंदिरात जावे आणि पूजा करावी. त्यानंतर एका विड्याच्या पानावर केशराने 'श्रीं' लिहून हे पान लक्ष्मी-विष्णूंच्या चरणाजवळ ठेवावे. थोड्यावेळाने हे पान घरी घेऊन यावे आणि लाल कपड्यात बांधून आपल्या घरात किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे बरकत कायम राहील

बातम्या आणखी आहेत...