आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकादशी आणि सोमवार योगात करा यापैकी कोणताही 1 उपाय, श्रीविष्णू आणि लक्ष्मी होतील प्रसन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. आज (9 जुलै, सोमवार) ही एकादशी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यास मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. भगवान विष्णूंचे उपाय केल्याने देवी लक्ष्मीही प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग जुळून येतात. एकादशीला येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...


1. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे तसेच देवी लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करावे.


2. एकादशीला भगवान विष्णूंना खीर, पिवळे फळ किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.


3. तुम्हाला धन लाभाची इच्छा असल्यास एकादशी तिथिला भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची पूजा करावी.


4. एकादशीच्या रात्री तुळशीजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला नमस्कार करावा.


5. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंच्या वास मानण्यात आला आहे. यामुळे एकादशीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...