आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८ वर्षांनंतर कोकिळा व्रत योग, सुवासिनींसाठी यंदाचे वर्ष चांगले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- यंदा अधिक मास, कुंभमेळा असे सगळे पर्व येत असून, तब्बल १८ वर्षांनंतर येणाऱ्या कोकिळा व्रताचाही योगायोग याच वर्षी आला आहे. त्यामुळे सुवासिनींसाठी यंदाचे वर्ष अत्यंत चांगले आहे. अधिक मास संपल्यानंतर ३० जुलैपासून कोकिळा व्रतास सुरुवात होत असून, २९ ऑगस्टपर्यंत हे चालेल.
घराच्या प्रांगणात किंवा डब्यात आंब्याचे रोप लावावे. त्यानंतर चांदी, सोने, धातू किंवा लाख याप्रकारातील कोणतीही कोकिळेची मूर्ती झाडावर बसलेल्या स्वरूपात स्थापन करावी.
मंत्रोच्चारात पूजा करावी. वास्तू पूजेप्रमाणेही पूजा करण्यात येते. १, ५, ११, २१ जोडप्यांना भोजन देऊन सुवासिनींची ओटी भरावी. साडी, चोळी, बांगड्या, पोत, फळ, कुंकवाचा करंडा, जोडवे, अलंकारांचाही समावेश करावा. हे दान ३१ जुलै (पौर्णिमा), ११ ऑगस्ट (व्यतितयोग), १४ ऑगस्ट (अमावास्या), २४ ऑगस्ट (वैधुतीयोग), २७ ऑगस्ट (द्वादशी), २९ ऑगस्ट (नारळी पौर्णिमा) रोजी करावे असे पुरोहितांनी सांगितले.
असे करता येते व्रत
कोकिळेचा आवाज ऐकणे चांगले असते. प्रत्येक जण आपापल्या परीने व्रत करीत असते. निज आषाढ पौर्णिमेला व्रत सुरू होऊन श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती होते. एका वेळेला भोजन करून, जमिनीवर झोपून, कोकिळेचे शब्द ऐकून, महिनाभर उपवास करणे, यापैकी कोणत्याही पर्यायाने हे व्रत केले जाते; परंतु तसे जमल्यास शेवटचे सात, तीन, एक दिवस हे व्रत केल्यास चालते.
कोकिळा शहरातून हरवल्या असल्या तरी या माध्यमातून पक्ष्यांना वाचविता येणार आहे.
- निज आषाढ शुद्ध पौर्णिमेस या व्रताची सुरुवात होते तर श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती होते. सौभाग्याचे हे व्रत असून चतुर्मासात ज्याप्रमाणे नियम पाळले जातात. त्याचप्रमाणे याचे नियम आहेत. आपल्या इच्छेनुसार महिला हे व्रत करू शकतात. आषाढ महिन्यात अधिक आला तरच हे कोकिळा व्रत येते. घरातील सुख-शांती, धनधान्य समृद्धी यासाठी हे व्रत केले जाते.
अनंत भालेराव, पुरोहित
बातम्या आणखी आहेत...