आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली स्थित स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर मानले जाते. 100 एकर जागेवर निर्माण केलेले हे मंदिर, निव्वळ नैसर्गिक दगडांना एकावर एक ठेवून तयार केलेले आहे. निर्मितीत लोखंडाचा वापर केलेला नाही. मुख्य मंदिरात 11 फूट उंचीची, भगवान स्वामिनारायण यांची पद्मासनस्थ, भव्य मूर्ती प्रतिष्ठित आहे. ती पंचधातूंची घडवलेली असून सुवर्णमंडित आहे.
मंदिरास आपल्या भारतीय परंपरेनुरूप हत्तीशिल्पांचे तोरण असलेला उंच पाया आहे. मंदिरात अनेक सुशोभित द्वार (दार) बनवण्यात आले आहेत. या ठिकाणी मयूर द्वार, भक्ति द्वार, दश द्वार नावाचे द्वार आहेत. मयुर दारावर भव्य तोरण आणि खाबांवरती जवळपास 869 मोर नृत्य करताना दिसतात. हे शिल्पकलेचे एक उत्तम कलात्मक उदाहरण आहे.
अक्षरधाम मंदिर तयार करण्यासाठी 11 हजार शिल्पकारांनी दिवसरात्र कष्ट केले. हे मंदिर बांधण्यासाठी जवळपास पाच वर्षांचा कालावधी लागला. मंदिरात 20 हजार मूर्ती आहेत, ज्या भक्तांचे मन मोहून घेतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मंदिराचे मनमोहक फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.