आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिनिज बुकमध्‍ये नोंद असलेले हे आहे जगातील सर्वात मोठे मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍लामधील स्‍वामीनारायण अक्षरधाम मंदिराची 2005 मध्ये गिनिज बुकमध्‍ये नोंद करण्‍यात आली. त्यामुळे हे जगातील सर्वात मोठे मंदिर असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. या मंदिराचा परिसर 100 एकरचा आहे. भारताच्या राजधानीत यमुनेच्या काठी वसलेल्या या मंदिराने जगातील 7 आश्चर्यात पाचवे स्थान पटकविले. अद्वितीय स्थापत्य कला, प्राचीनता आणि आधुकनिकतेचा संगम, भव्यता यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. ताजमहल निश्चितच वास्तुशिल्पाचा एक अजोड नमुना आहे, परंतु दिल्लीतील हे मंदिर एक प्रमुख आकर्षण मानले जाते.

हे मंदिर जगातील सर्वात विशाल हिंदू मंदिर आहे. या मंदिरात हस्तशिल्पाने घडविलेले 234 वैशिष्ट्यपूर्ण खांब आहेत. वैभवशाली भारताची ओळख करून देण्यासाठी अदभुत नौका विहार आहे. बालयोगी नीलकंठ यांच्या जीवनावरील आयमॅक्स सिनेमा आणि 20 मूर्तींमुळे या मंदिराच्या सौंदर्यात भर पडते. या मंदिराच्या निर्मितीसाठी 1 कोटी 20 लाख मानवी तास श्रम खर्ची पडले आहेत. म्हणजे एखाद्या माणसाने 1600 वर्षांपूर्वी 24 तास सतत मंदिर निर्मितीला सुरुवात केली असती तरी आजपर्यंत हे मंदिर पूर्ण होऊ शकले नसते.

या मंदिराच्या निर्मितीसाठी 11 हजार शिल्पकारांची फौज लावण्यात आली होती. या शिल्पकारांना मंदिर पूर्ण करायला 5 वर्षे लागली. सर्वाधिक आश्चर्यचकित करणारी महत्त्वाची बाब म्हणजे या मंदिराच्या संपूर्ण निर्मितीत कोठेही सिमेंट आणि स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही. पूर्ण बांधकाम केसरी पाषाणांना जोडून केले आहे.

दिल्लीला येणा-या पर्यटकांपैकी 70 टक्के पर्यटक अक्षरधाम मंदिराला भेट देतात. 100 एकर एवढ्या विस्तीर्ण भूभागावर वसलेल्या या मंदिराची तुलना अन्य वास्तुशी करता येणार नाही, असे हे एकमेवाद्वितीय मंदिर आहे.

पुढे पहा या मंदिराचे काही खास फोटो...