आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीया आज : ही कामे केल्याने रुष्ट होते धनाची देवी लक्ष्मी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (21 एप्रिल, मंगळवार) अक्षय्य तृतीया आहे. धर्म ग्रंथानुसार हा दिवस देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. कारण या दिवशी करण्यात आलेल्या पूजन, हवन, दान कर्माचे संपूर्ण फळ प्राप्त होते. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. सामान्यतः सर्व लोकांच्या मनामध्ये हाच विचार असतो की, पूजा-अर्चना केल्य्ने देवी लक्ष्मी प्रसन्न होते परंतु महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजेसोबतच इतर नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे.

या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास लक्ष्मी पूजेचे फळ निष्फळ होते आणि भक्ताला धन, यश, मन-सन्मान प्राप्त होऊ शकत नाही. शास्त्रानुसार काही कार्य असे आहेत, जे केल्याने महालक्ष्मीच्या कृपा प्राप्तीमध्ये बाधा उत्पन्न होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामांविषयी सांगत आहोत. ही कामे केल्याने देवी लक्ष्मी रुष्ट होते.

1. वायू पुराणानुसार जो व्यक्ती स्नान न करता तुळशीचे पान तोडून देवाला अर्पण करतो अशा पूजेचा देव स्वीकार करत नाहीत आणि देवी लक्ष्मीसुद्धा रुष्ठ होते. सकाळी स्नान केल्यानंतर जो व्यक्ती देवतांसाठी स्वतः फुलं तोडून ते अर्पित करतो, देवगण त्या फुलांचा प्रसन्नतेने स्वीकार करतात.

2. जे लोक अस्वच्छ अवस्थेत देवाची पूजा करतात, महालक्ष्मी अशा लोकांचा लगेच त्याग करते. अस्वच्छ अवस्था म्हणजे, दात न घासता, स्नानाशिवाय किंवा स्वच्छ वस्त्र परिधान न करणे. तसेच पूजा करताना मनाची अवस्थाही स्वच्छ असावी म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष, विकार, क्रोध नसावा.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर कोणत्या कामांपासून दूर राहावे...