आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीया : घरात सुख-समृद्धीसाठी या विधीनुसार करा लक्ष्मी पूजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये वैशाख मासातील शुक्ल पक्ष तृतीया तिथीला अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी करण्यात आलेल्या व्रत, दान, हवन, उपासनेचे अक्षय्य म्हणजे संपूर्ण फळ मिळते. त्यामुळे या तिथीला अक्षय्य तृतीय म्हटले जाते. या वर्षी अक्षय्य तृतीयेचा सण 28 एप्रिल शुक्रवारी आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा आणि उपाय केल्यास घरामध्ये स्थायी स्वरुपात धन-संपत्तीचा वास राहतो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा खालील विधीप्रमाणे करावी...
 
पूजन विधी -
पूजेसाठी एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर लाल कपडा टाकून त्यावे देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. पूजेच्या दिवशी घर स्वच्छ करून स्वतः पवित्र होऊन श्रद्धापूर्वक महालक्ष्मीची पूजा करावी. महालक्ष्मीच्या मूर्तीजवळच एका स्वच्छ भांड्यात केशरयुक्त चंदनाने अष्टदल कमळ काढून त्यावर दागिने किंवा थोडे पैसे ठेवा. सर्वप्रथम पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून स्वतःवर पाणी शिंपडून घ्यावे तसेच पूजन सामग्रीवर खालील मंत्राचा उच्चार करून पाणी शिंपडावे...

ऊं अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा।
य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि:।।

त्यानंतर जल-अक्षता(तांदूळ) हातामध्ये घेऊन पूजेचा संकल्प करावा...
ऊं मनो जूतिर्जुषतामाज्यस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनोत्वरिष्टं यज्ञ समिमं दधातु। विश्वे देवास इह मादयन्तामोम्प्रतिष्ठ।।
ऊं अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन।।

खालील मंत्राचा उच्चार करून महालक्ष्मीची षोडशोपचार पूजा करा.
ऊं महालक्ष्म्यै नम -

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभफळ प्राप्त करण्यासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...