अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं व दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै: ।
तत् च अक्षयंभवति भारत सर्वमेव ।।
अक्षय तृतीयेच्या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणजे नाश पावत नाही. म्हणूनच या तिथीला ‘अक्षय ’ तृतीया म्हणतात. देवांप्रमाणेच पितरांसाठीही या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
इंग्रजी वर्ष 1 जानेवारीपासून, आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून, हिंदू वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शु. प्रतिपदा, तर शैक्षणिक वर्ष 1 जूनपासून सर्वसाधारणपणे सुरू होते. सर्व वर्षांत बारा महिनेच आहेत. वर्षाचे बारा महिने असावेत, हे सर्वप्रथम वेदांनीच सांगितले आणि ‘द्वादशमासै: संवत्सरे’ हे जगाने मान्य केले. झाडांना नवी पालवी फुटली, म्हणजेच ब्रह्मदेवाने ज्या दिवशी सृष्टीची निर्मिती केली अशा चैत्र शु. प्रतिपदेस नववर्ष सुरू झाले की, अक्षय तृतीया हा पहिला सण. हा असा मुहूर्त आहे की, त्यादिवशी कोणतेही कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही. हा संपूर्ण दिवस शुभ असतो.
हा दिवस पितरांची सेवा करण्याचा दिवस आहे. दुपारी बारा वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे. यादिवशी पितृतिथीही आहे. या पवित्रदिनी गंगास्नान, यज्ञ-होम, यवदान, यवभक्ष्यण करावे. उन्हापासून संरक्षण करणार्या छत्री, जोडे अशा वस्तूही दान करण्याची पद्धत आहे.
पुढे जाणून घ्या, स्त्रियांच्या दृष्टीने हा दिवस का महत्त्वाचा असतो...