आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 11 गोष्टी पूजा करताना सर्वांनी लक्षात ठेवल्या पाहिजे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू कुटूंबात रोज देवी-देवतांची पूजा करण्याची प्रथा आहेत. पूजापाठ करणे हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. आपल्या धर्म ग्रंथांत देवांसंबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. या गोष्टी खुप महत्त्वाच्या आहेत. आज आम्ही तुम्हाला पूजे संबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.

1. सूर्यदेव, श्रीगणेश, दुर्गा, शिव आणि विष्णुला पंचदेव म्हटले जाते. सुखाची इच्छा ठेवणा-या प्रत्येक मनुष्याला या पाच देवांची पुजा अवश्य केली पाहिजे. कोणत्याही शुभ कार्याअगोदर यांची पूजा करणे गरजेचे आहे.

2. महादेवाच्या पूजेत कधीच केतकीच्या फूलांचा वापर करु नये. सूर्यदेवाच्या पूजेत कधीच अगस्त्यचे फूल चढवू नये. गणपतीच्या पूजेत तुळशी कधीच अर्पण करु नये.

3. सकाळी अंघोळ केल्यावरच देवासाठी फूले तोडावी. वायु पुराण प्रमाणे जो व्यक्ति अंघोळ न करता फूल तोडतो आणि देवाला अर्पित करतो त्याची पूजा देव ग्रहण करत नाही.

4. देवाची पूजा करताना अनामिका या बोटाला सुगंधीत (चंदन, कुंकू, अबीर, गुलाल, हळद, मेहंदी) काही तरी लावले पाहिजे. पूजेमध्ये आपल्या डावीकडे शुध्द तुपाचा दिवा आणि उजवीकडे तेलाचा दिवा लावला पाहिजे.

पूजे संबंधीत काही अन्य गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...