आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमलकी एकादशी आज : या विधीने करा व्रत आणि पूजा, वाचा महत्त्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला आमलकी एकादशी असे म्हणतात. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी मानली जाते. या दिवशी व्रत केल्यास भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची विशेष पूजा केली जाते. या वर्षी ही एकादशी 19 मार्च, शनिवारी आहे.

व्रत विधी
आमलकी एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर उभे राहून हातामध्ये तीळ, कुश (एक प्रकारचे गवत) आणि पाणी घेऊन संकल्प करावा की, 'हे पुंडरीकाक्ष ! हे अच्युत ! मी आज निराहार राहून द्वादशीला भोजन करेन. आपण मला शरण द्यावी. मी कोट्यवधी जन्मांमध्ये जी पापकर्मे केलेली आहेत त्या सर्व पापांचा नाश करावा.' त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करावा.

मंत्र
मम कायिकवाचिकमानसिक सांसर्गिकपातकोपपातकदुरित क्षयपूर्वक श्रुतिस्मृतिपुराणोक्त फल प्राप्तयै श्री परमेश्वरप्रीति कामनायै आमलकी एकादशी व्रतमहं करिष्ये।

असा संकल्प केल्यानंतर श्रीहरीचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पूजन सामग्री घेऊन आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. सर्वात पहिले आवळ्याच्या वृक्षाखालची जमीन झाडून, सडा-सारवण करून स्वच्छ आणि शुद्ध करावी. पवित्र झालेल्या भूमीवर मंत्रोच्चारणासह पाण्याने भरलेल्या नवीन कलशाची स्थापना करावी. कलशात पंचरत्न, गंध टाकावे. कलशाला श्वेत चंदन लावून पुष्पहार घालावा. कलशावर एक पाठ ठेवून त्यावर परशुरामाच्या सुवर्णमूर्तीची स्थापना करावी. त्यानंतर विधिव्रत परशुरामाची पूजा करावी. भक्तिपूर्वक भजन-कीर्तन, धार्मिक प्रवचन करीत जागरण करावे. श्रीहरींचे नामस्मरण करीत आवळ्याच्या झाडाला एकशे आठ किंवा अठ्ठावीस प्रदक्षिणा घालाव्यात. द्वादशीला सकाळी श्रीहरींची आरती करावी. ब्राह्मणाची पूजा करून तेथील सर्व पूजा सामग्री त्याला अर्पण करावी.

आमलकी एकादशीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...