आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मुस्लिम व्यक्तीने शोधली होती अमरनाथ गुहा, नाव होते बुटा मलिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमालय पर्वत रांगांमध्ये स्थित असलेल्या पवित्र अमरनाथ गुहेची यात्रा करणाऱ्या भाविकांना एक प्रश्न अवश्य पडतो की, एवढ्या उंचीवर स्थित असलेल्या गुहेत सर्वात पहिले कोण पोहोचले आणि गुहेतील महादेवाचे या रूपातील दर्शन कोणी घेतले? या प्रश्नाचे उत्तर पुराण आणि लोक मान्यतांमधून मिळते. परंतु या गुहेच्या शोधाविषयी असेही सांगितले जाते की, या गुहेचा शोध एका मुस्लिम व्यक्तीने लावला. या व्यक्तीचे नाव बुटा मलिक असे होते. मलिक गुरे चारण्याचे काम करत होता. मलिकच्या कुटुंबातील लोक आजही अमरनाथ गुहेची देखभाल करतात.

काश्मीरसहित संपूर्ण भारतामध्ये अमरनाथ गुहेसंदर्भात जी कथा प्रचलित आहे त्यानुसार, बुटा मलिकनेच या गुहेचा शोध लावला होता. असे मानले जाते की, गुरे चारण्याचे काम करणारा हा व्यक्ती खूप चांगल्या मनाचा होता. एके दिवशी तो गुरे चारत असताना खूप दूर निघून गेला. या बर्फाळ प्रदेशात त्याला एक साधू भेटले. त्या साधूने बुटा मलिकला कोळशाने भरलेली एक शेगडी दिली. घरी आल्यानंतर बुटाला त्या शेगडीमध्ये कोळशाच्या ठिकाणी सोने दिसले. हा चमत्कार पाहून तो चकित झाला आणि साधूचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा त्याच ठिकाणी गेला. परंतु त्याला तेथे साधू भेटले नाहीत तर एक मोठी गुहा दिसली. गुहेत प्रवेश केल्यानंतर त्याने पाहिले की, देवादिदेव महादेव बर्फापासून तयार झालेल्या शिवलिंग रुपात स्थापित होते. त्यानंतर त्याने ही घटना गावातील लोकांना सांगितली आणि त्यानंतर हा प्रसंग तत्कालीन राजाच्या दरबारात पोहोचला. त्यानंतर काळाच्या ओघात या ठिकाणचे महत्त्व वाढतच गेले आणि हे एक तीर्थस्थळ बनले.
हा दावाही केला जातो
इतिहासकार या गुहेच्या शोधाबद्दल सांगतात की, ज्या बुटा मलिकने या गुहेचा शोध लावला तो मुस्लिम नव्हता. 18 व्या आणि 19 व्या शतकात या गुहेच्या शोध लावणारा बुटा मलिक गुज्जर समाजातील होता. असाही तर्क लावला जातो की, एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची कमतरता असताना बुटा गुरे घेऊन तेथे का गेला. काही स्थानिक इतिहासकार मानतात की, 1869 च्या ग्रीष्मकाळात (उन्हाळा) गुहेचा पुन्हा शोध घेण्यात आला आणि पवित्र गुहेची पहिली औपचारिक तीर्थयात्रा 3 वर्षानंतर 1872 आयोजित करण्यात आली होती. या यात्रेमध्ये बुटा मलिकसुद्धा सहभागी होते. परंतु अमरनाथ यात्रेसंदर्भात उपलब्ध असललेल्या साहित्य, बुक्स आणि माहितीनुसार बुटा मलिक यांना मुस्लिम सांगण्यात आले आहे. अमरनाथ गुहेची देखभाल करत असलेले कुटुंब मुस्लिम असून ते स्वतःला बुटा मलिक यांचे वंशज मानतात.

पुढील स्लाईड्सवर पाहा, अमरनाथ यात्रेचे काही निवडक फोटो....