आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील चकवाल येथे स्थित आहे महादेवाचे 900 वर्ष जुने मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाशिवरात्रीला भारतामध्ये ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात, तर पाकिस्तानातील काही भागांमध्ये स्थित असलेल्या शिव मंदिरात प्रत्येक वर्षी शिवरात्रीला मोठ्या संख्येने भक्त पोहोचतात. शिवरात्रीच्या निमित्ताने भारतातून 21 तीर्थयात्रींचा समूह पाकिस्तानात गेला आहे. शिवरात्रीला हे सर्व भक्त पाकिस्तानातील प्रसिद्ध शिव मंदिरात पूजा करतील. पाकिस्तानात स्थित असलेले कटासराज शिव मंदिर 900 वर्ष जुने आहे. पाकिस्तान सरकारने मागील काही वर्षांपासून भारताच्या यात्रेकरूंना येथे येण्याचे परवनागी दिली आहे. येथे जाणून घ्या, पाकिस्तानातील काही प्राचीन शिव मंदिरांची माहिती....

कटासराज मंदिर, चकवाल

पाकिस्तानातील सर्वात मोठे शिव मंदिर कटासराज आहे. हे लाहोरपासून 270 किलोमीटर दूर चकवाल जिल्ह्यात स्थित आहे. येथील मान्यतेनुसार, वनवास काळात पांडवानी येथे जवळपास 4 वर्ष वास्तव्य करून या शिवलिंगाची उपासना केली होती. हे मंदिर 900 वर्ष जुने असून मंदिराजवळ एक तलाव आहे. या तलावाशी संबधित एक मान्यता अशी आहे की, सतीने आत्मदहन केल्यानंतर महादेव सतीचे शव घेऊन भ्रमण करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब पडले. या अश्रुंपासून दोन तलाव तयार झाले. यामधील एक तलाव भारतातील पुष्कर क्षेत्रामध्ये ब्रह्म तलाव नावाने प्रसिद्ध आहे तर दुसरा कटासराज मंदिराजवळ आहे. या तलावाचे पाणी दोन रंगाचे आहे. तलावाची खोली कमी असलेल्या पाण्याचा रंग हिरवा असून खोल ठिकाणावरील पाणी निळ्या रंगाचे आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, पाकिस्तानातील इतर काही प्राचीन शिव मंदिर....