आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे लोखंडाच्या साखळीने स्नान करतात महिला, भक्तीमध्ये लीन होतात लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोखंडाच्या साखळीने स्नान करताना महिला. - Divya Marathi
लोखंडाच्या साखळीने स्नान करताना महिला.
जम्मूमध्ये आयोजित झीरी मेळ्यात बुधवारी लोकांनी भक्तीच्या सागरात डुबकी लावली. या मेळ्यामध्ये हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. या दरम्यान काही महिला भक्तीमध्ये दंग होऊन नृत्य करताना दिसल्या. येथील तलावात महिला लोखंडाच्या साखळीने स्नान करतात. स्थानिक मान्यतेनुसार असे केल्याने शेतामध्ये धन-धान्य भरपूर प्रमाणात येते.

झीरी मेळा जितु बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केला जातो. बाबा जितु झीरी एक साधेसरळ आणि प्रामाणिक शेतकरी होते. त्यांनी स्थानिक सावकारांसमोर आपल्या कष्टाने पिकवलेले धान्य देण्यास नकार दिला आणि अत्याचाराच्या विरोधात झीरी गावात देहत्याग केला. झीरी गाव जम्मू शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. येथे बाबा आणि त्यांच्या भक्तांच्या विविध कथा प्रचलित आहेत. उत्तर भारतातून अनेक भक्त येथे या मेळ्यात उपस्थित राहतात. बाबाच्या सन्मानार्थ झीरी मेळा प्रत्येक वर्षी जम्मूमध्ये आयोजित केला जातो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, या मेळ्यातील काही खास फोटो....