आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचला एकादशी आज : लक्षात ठेवा या गोष्टी, वाचा व्रत विधी आणि कथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये विविध व्रत, उपवास केले जातात. या सर्वांमध्ये एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला अचला तसेच अपरा एकादशी म्हणतात. या वर्षी हे व्रत 14 मे, गुरुवारी आहे. पुराणांनुसार अचला एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्म हत्या, परनिंदा, भूत योनी इ. पापांमधून मुक्ती मिळते. अचला एकादशी व्रताचा विधी पुढीलप्रमाणे आहे..
व्रत विधी -
अचला एकादशीच्या दिवशी स्नान करून पवित्र झाल्यानंतर संकल्प करून भगवान श्रीविष्णूचे पूजन करावे. श्रीहरिला फुल, फळ, तीळ, दुध, पंचामृत इ. पदार्थ अर्पण करावेत. दिवसभर उपवास करावा. एकादशी व्रतामध्ये ब्राह्मणाला भोजन आणि दक्षिणा देण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे द्वादशी तिथी (15 मे, शुक्रवार) ला ब्राह्मणाला जेवणासाठी आमंत्रित करून दक्षिणा देऊन तृप्त करावे. अशाप्रकारे अचला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

अचला एकादशी व्रत करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
1. पूजेमध्ये अक्षता ऐवजी तीळ अर्पण करावेत
2. आळस करू नये
3. श्रीहरीचे नामस्मरण करावे.
4. तुळशीचे पान टाकून देवाला नैवेद्य दाखवावा.
5. रात्री जागरण करावे
6. ब्रह्मचर्यचे पालन करावे.

या एकादशी व्रताची कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...