आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐहिक आनंद आणि श्रद्धेच्या आनंदातील फरक ओळखा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैशाच्या प्रभावामुळे किंवा पैशाच्या अभावामुळे व्यक्ती कुठेतरी भटकतात, अटकतात. अभाव, अज्ञान आणि भय सत्याचा पाया ठिसूळ करणाऱ्या गोष्टी आहेत. यातूनच फसवणुकीचा जन्म होतो. अज्ञान तर समस्त फसवणुकींना जन्म देणारा कारखानाच आहे. असत्यातून येणारी भ्रामक श्रद्धा माणसाची आयुष्यभर फसवणूक करत असते. माणूस प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला आतूर असतो. विज्ञान युगातील माणसाला सत्याचा आनंद हा वस्तूचा, तर श्रद्धेचा आनंद हा कल्पनेचा आनंद वाटतो. या दोन्ही आनंदातील फरक मृत्यूच्या दारात जाईपर्यंत कळत नाही. हीच खरी मानवाची शोकांतिका. हवं ते मिळत नाही, नको ते टळत नाही. ही शोकांतिकेची सरळ सरळ व्याख्या. गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा पाहिजेच. नाव (संसार) चालविण्यासाठी पाण्याची (पैसा) नितांत गरज असतेच, पण नावेमध्ये सतत पाणी आले तर? भारतीय समाजव्यवस्थेत पैसा कमविणे सोपे आहे, पण नाते टिकविणे कठीण आहे. जीवनाची आचारसंहिता म्हणजे धर्म. धर्माचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान असते. धर्माचा अर्थ कर्तव्य. जाळणे हा आगीचा, उष्णता हा सूर्याचा, थंडपणा हा बर्फाचा धर्म. धर्म हा मानवी मूळ स्वभाव. तो चैतन्यशील, अखंड, सर्व संघर्षापासून दूर तर असतोच, पण सुखदायक, आनंददायक असतो. हा आनंदी स्वभाव जाणून घेणे म्हणजेच धर्मदर्शन. धर्म जर अध्यात्ममूलक झाला, तर मानव व समाजाचे जीवन आनंददायी होईल. भौतिक शरीरामुळे मिळणारे ऐहिक सुख प्रत्येक प्राणीमात्रांत सारखेच असते. दु:खी होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, पण सुख-आनंद आपल्या योग्यतेनुसार मिळतो. पैशाला स्पर्श न करताही रामकृष्ण परमहंस शिष्य विवेकानंद सुख व आनंदाने जगले. रामकृष्णांनी पत्नीला (सारदादेवी) मृत्यूपूर्वी धर्माचे ज्ञान, भाव व कर्तव्य समजावून सांगितले.
अॅड.राम हरपाळे
बातम्या आणखी आहेत...