आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वनिर्माता प्रभू विश्वकर्मा (प्रकटदिन विशेष)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वकर्मा म्हणजे देवतांचा करागीर आहे. अशी एक समजूत सर्वसामान्यांमध्ये आढळून येते. पांचाल समाजबांधवही त्याला अपवाद नाही. विश्वकर्मा वंशज म्हणून ज्या पाच समाजांची ओळख आहे, ते सुतार, लोहार, सोनार, ताक्रकार व शिल्पकार हे पाचही समाजबांधव महाराष्ट्रात पांचाल म्हणून ओळखले जातात. दक्षिण भारतात हाच समाज विश्वब्राह्मण म्हणून, तर उत्तर भारतात विश्वकर्मा समाज म्हणून सुपिरिचित आहे. हा समाज प्रामुख्याने कारागिरी करणारा आहे. त्यामुळे भगवान विश्वकर्माबाबत “ देवतांचा कारागीर’ हे संबोधन रुढ होत गेले. पण हिंदू धर्माचा इतिहास मानल्या जाणाऱ्या वेद, पुराण, उपनिषदे, वअन्य संस्कृत ग्रंथांचा धांडोळा घेतला असता भगवान विश्वकर्मा हा केवळ देवतांचा कारागीरच नसून तोच सृष्टिनिर्मितीची बीजे निर्माण करणारा व जड चेतन सृष्टी निर्माण करणारा विश्वनिर्माता आहे, अशीच माहिती मिळते.
“पौरुषेय प्रवर विधि’ चा या संस्कृत वाङ्ममयात एक श्लोक आहे. न भूमिर्न जलं न तेजो न च वायव:| न चाकोशे न चितंच न युध्दया प्राण गोचर:| न च ब्रम्ह न विष्णुक्ष न च तारका:| सर्व शून्य निरावलम्बे स्वयंभू विश्वकर्मा||
अर्थ : जमीन नव्हती, पाणी नव्हते, प्रकाश नव्हता, आकाश नव्हते आणि वायूही नव्हता, तारकाही नव्हत्या, ब्रम्हा, विष्णूही नव्हते. सर्व शून्य असतातना केवळ एक आणि एकच विश्वकर्मा अस्तित्वात होता. शिवपुराणातील उल्लेखानुसार भगवान शंकराने पार्वतीला सांगितले की, पंचवदन भगवान विश्वकर्मा हाच परमात्मा आदिपुरूष आहे. सृष्टीनिर्माता तोच आहे. त्यानेच सकंल्यानुसार सुरूवातीलचा सृष्टी निर्माण करण्यासाठी जे जे उत्पन्न करावेसे वाटत होते. ते ते निर्माण करून ठेवले. भगवान विश्वकर्माच्या पाच मुखांपासूनच चौदा भुवने, पंचमहाभुते, पंच तन्मात्रा, पंचदेव व पंचपुत्र निर्माण झालेत. परमात्मा विश्वकर्माच्या पूव मुखाचे नाव “ सद्योजात’ आहे. दक्षिणेकडील मुखाचे आहे. उत्तरेकडील मुख “ईशान’ नावाने ओळखले जाते. तर ऊर्ध्वमुखाला “तत्पुरुष’ हे नाव आहे. भगवान विश्वकर्माच्या स्वरूपाबाबत एक श्लोक स्कंदपूराणात आहे. या श्लोकात म्हटले आहे की, सर्वदष्टीधारक असलेला भगवान विश्वकर्मा हंसावर आरूढ व शुभमुकूट धारण केलेल्या आहे. हा परमपिता वृद्धकाया असून त्याच्या हातात कम्बासूत्र, जलपात्र, पुस्तक व ज्ञानसुत्र आहे. भगवान विश्वकर्माचे विविध अवताराचे उल्लेख श्रीमद््भागवत महापुराण, वायुपुराण, ब्रम्हांड पुराण, भविष्य पुराण, हरिवंश पुराण, स्कंद, पुराण, महाभारत आदि ग्रंथात आहेत. वेगवेळ्या राज्यांत त्या त्या अवतारांचे जन्मदिन साजरे होतात. कामगार संघटनाही वेगळ्या दिवशी विश्वकर्मा जयंती साजरी करतात. महाराष्ट्र, दक्षिण भारत व उत्तर भारतातील काही राज्यातील पांचाल समाज माघ शु. त्रयोदशीला जयंती साजरी करतात.
भगवान विश्वकर्माची पाच मुले असून त्यांची नावे मनु, मय, त्वष्टा, तक्ष आणि शिल्पी अशी असून ते ब्रहार्षी होते तक्षलाच काही सस्कृंत वाङ्मयात दंवज्ञ, विश्वज्ञ असेही म्हटले आहे. ही पाच मुलेच शिल्पशास्त्राचे प्रवर्तक आहेत. याच पाच मुलांनी पाच वेगवेगळ्या शिल्पकारी व्यवसायाला प्रांरभ केला. मनु ब्रम्हर्षीपासून करणाऱ्या सुतारांची वंशावळ सुरू झाली. मय ब्रह्मर्षीपासून तांबे, पितळ यावर कलाकारी करणाऱ्या ताम्रकारांची वंशावळ सुरू झाली. तक्ष/ दैवेज्ञ/विश्वज्ञ ब्रह्मर्षीपासून सोन्या चांदीवर कलाकारी करणाऱ्या सोनारांची वंशावळ सुरू झाली आणि शिल्पी ब्रह्मर्षीपासून दगडावर कलाकारी करणाऱ्या शिल्पकारांची (पाथरवट) वंशावळ सुरू झाली. विश्वकर्मात्मज समाजालाच विश्वब्राह्मण, पांचालब्राह्मण, कामलार, जांगीडब्राह्मण, रथकार, तरखान, स्वपती, नारांशस अशी विविध नावांनी अन्य राज्यांमध्ये ओळखले जाते. महाराष्ट्रात हा समाज पांचाल म्हणून ओळखला जातो. हा समाज गळ्यात जानवे घालतो म्हणून काही ठिकाणी जानवेसमाज म्हणूनही या समाजाला ओळखतात.
बातम्या आणखी आहेत...