आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devsyni Ekadashi, Lord Vishnu, Prathama Ekadashi, Shayani Ekadashi, Devpodhi Ekadashi

आषाढी एकादशी आज : जाणून घ्या महत्त्व, व्रत विधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. धर्म ग्रंथानुसार या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिने पाताळात शयन करतात. या चार महिन्यांना चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास देवाच्या भक्तीचा काळ मानण्यात आला आहे. या दरम्यान कोणतेही मंगलकार्य केला जात नाहीत. या वर्षी देवशयनी (आषाढी) एकादशी 27 जुलै, सोमवारी आहे.

धर्मशास्त्रानुसार वामन रुपातील भगवंताने बळीराजाला यज्ञप्रसंगी तीन पावलं भूमी मागीतली. भगवंताने पहिल्या पावलात पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशा व्यापून टाकल्या, दुस-या पावलात स्वर्गलोक व्यापलं. तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवावं अशी बळीराजाने विनंती केली. या दानाने प्रसन्न होऊन भगवंताने बळीला पाताळाचा राजा बनविले आणि वर मागण्यास सांगितले. बळीराजाने विनंती केली की भगवंताने सदैव त्याच्या महलात राहावे. बळीराजाच्या भक्तीचा मान राखत भगवंताने वर्षातून चार महिने तिथे निवास करण्याचे मान्य केले. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णु देवशयनी एकादशीपासून देव प्रबोधिनी एकादशीपर्यत पाताळलोकात बळीच्या महलात निवास करतात. याच काळाला चातुर्मास म्हणतात.

भगवान विष्णूचा पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...