आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashtavinayak, Girijatmaj Vinayaka Temple Lenyadri, Information In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टविनायक: पुत्र प्राप्तीसाठी माता पार्वतीने लेण्याद्री येथे 12 वर्षे केली होती तपश्चर्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा अष्टविनायकापैकी सहावा गणपती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या सहवासात कुकडी नदीच्या परिसरातील डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. येथे बौद्धांचे एक सुंदर लेणे आहे. त्यामुळे या डोंगरास लेण्याद्री म्हणतात

श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे चारशे पायर्‍या आहेत. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून सात किलोमिटर अंतरावर आहे. पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, पार्वतीने का केली 12 वर्षे तपश्चर्या