आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashtavinayak: Morgaon Mayureshwar Temple Information In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टविनायक: लोह आणि रत्नाच्या अणूंपासून बनली मोरगावच्या मोरेश्वराची मूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मोरगावचा मोरेश्वर ओळखला जातो. येथील मूर्ती अतिशय नयनमनोहर आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती असून उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. श्रींच्या भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी- सिद्धी आहेत. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी मोरेश्वराच्या पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. श्री समर्थ रामदास स्वामींना 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही आरती याच मंदिरात स्फुरल्याचे म्हटले जाते.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, लोह आणि रत्नाच्या अणूंपासून बनली मोरेश्वराची मूर्ती...