भीमा नदीच्या काठावर वसलेले सिद्धटेकचा 'श्री सिद्धिविनायक' हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. पाषाणाच्या सिंहासनावर सिद्धिविनायक विराजमान झालेली स्वयंभू मूर्ती आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण आहे. दौंडपासून सिद्धटेक 99 किलोमीटर अंतरावर आहे.
सिद्धिविनायकाची आख्यायिका...
मधु आणि कैटव अशा दोन राक्षसांनी सगळ्या देवताना त्रासून सोडले होते. दोन्ही राक्षसांना निःपात करण्याचे काम श्रीशंकराने विष्णूवर सोपविले. श्रीविष्णूला यासाठी श्रीगणेशाची उपासना करावी लागली होती. उपासना करण्यासाठी श्रीविष्णू सुयोग्य आणि निवांत स्थळाची शोध घेऊ लागले. नंतर ते एका टेकडीवर येऊन पोहोचले. तीच ही 'सिद्धटेक' टेकडी. या टेकडीवरच विष्णूने ‘श्रीगणेशायनमः’ असा मंत्र म्हणत तपश्चर्या केली होती.
श्रीविनायक विष्णुला प्रसन्न झाला. नंतर दोन्ही दैत्यांशी युद्ध करून विजयश्री मिळवण्यासाठी गणरायाकडून श्रीविष्णूने आज्ञा प्राप्त केली. श्रीविष्णूने त्या दैत्यांचा निःपात केला. इथेच श्रीविष्णूला सिद्धी प्राप्त झाली. म्हणूनच ह्या स्थळाला सिद्धक्षेत्र अथवा सिद्धटेक हे नाव प्राप्त झाला. टेकडीवर देवालय उभारण्यात आले. आणि गंडकी शिलेची श्रीविनायकाची मूर्ती स्थापन करण्यात आली.
काही काळानंतर ते देवालय लुप्त झाले आणि तेथे टेकडीच उरली. त्या टेकडीवर गावातली गुरे चरण्यासाठी येऊ लागली. एक दिवस मोठा चमत्कार घडून आला. त्या टेकडीवर श्रीगजानन प्रगट झालेले गुराख्यांना दिसून आले. गुराख्यांना फार आनंद झाला. ते गुराखी नित्यनेमाने भीमानदीवर स्नान करून बरोबर आणलेल्या शिदोरीचा त्या देवाला कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवू लागले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सिद्धिविनायकाचा महिमा...