आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी लोकांना माहिती असावे, या 8 नावांनी मिळते दीर्घायुष्य आणि वाढते आकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीर्घायुष्य, निरोगी आणि आकर्षक शरीर प्राप्त करण्यासाठी दररोज सकाळी पूजन कर्मासोबतच येथे सांगण्यात आलेल्या श्लोकाचा जप करावा. हा श्लोकाचा जप केल्यास व्यक्ती आजारांपासून दूर राहतो आणि 100 वर्षांचे आयुष्य प्राप्त करतो, अशी शास्त्रांची मान्यता आहे.

हा आहे मंत्र 
अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, या आठ लोकांचे (अश्वत्थामा, दैत्यराज बळी, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कंडेय ऋषी) सकाळी-सकाळी स्मरण केल्यास सर्व आजार नष्ट होतात आणि मनुष्य निरोगी आणि आकर्षक शरीर प्राप्त करून 100 वर्ष जगू शकतो. एखाद्या व्यक्तीला या श्लोकाचा जप करणे शक्य नसल्यास, त्याने या अष्ट चिरंजीवींच्या नावांचा उच्चार केला तरी शुभफळ प्राप्त होऊ शकते.

पुढे वाचा, या अष्ट चिरंजीवींच्या काही खास रोचक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...