आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक युगात अवतार घेतात श्रीगणेश, हे आहेत त्यांचे 4 रूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान विष्णू आणि महादेवाच्या अवतारांबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु तुम्हाला श्रीगणेशाच्या अवतारांविषयी माहिती आहे का? श्रीगणेशाने प्रत्येक युगात वेगवेगळे नाव, वाहन, गुण आणि स्वरुपात अवतार घेतले आहेत. गीता प्रेसच्या अवतार कथांकानुसार, श्रीगणेशाने सतयुगात महोत्कट विनायक नावाने, त्रेतायुगात मयुरेश्वर, द्वापरयुगात शिवपुत्र गजानन रुपात अवतार घेतले आणि कलियुगात धुम्रकेतू नावाने अवतार घेतील.

सतयुगात महोत्कट विनायक अवतार
सतयुगात श्रीगणेश महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांच्या पुत्र रुपात अवतरीत झाले. त्या युगामध्ये त्यांचे नाव महोत्कट होते. या रुपात त्यांचे वाहन सिंह होते आणि त्यांना दहा हात होते. श्रीगणेशाने या अवतारामध्ये धुन्धुर, धूम्राक्ष, जृम्भा, अंधक, नरांतक तसेच देवांतक राक्षसांचा वध केला. युद्धामध्ये श्रीगणेशाचा एक दात तुटल्यामुळे ते ढुण्ढिविनायक नावाने काशी (वाराणसी) येथे स्थापित झाले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीगणेशाच्या इतर अवतारांची सविस्तर माहिती...