आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bathing In This River To Get Away From The Many Defects

मान्यता : या नदीमध्ये केवळ स्नान केल्याने दूर होतात अनेक दोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नर्मदा आपल्या देशातील पवित्र नद्यांमधील एक नदी आहे. या नदीचा उल्लेख विविध धर्म ग्रंथांमध्ये आढळून येतो. वाल्मिकी रामायणानुसार या नदीच्या काठावर राजा कार्तवीर्य अर्जुनने रावणाला हरवले होते. धर्म शास्त्रानुसार नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याने विविध अडचणी दूर होतात. एवढेच नाही तर कालसर्प आणि ग्रह दोषाची शांती या नदीमध्ये स्नान केल्याने होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार जाणून घ्या, नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याने कोणकोणते लाभ होतात....

1 - जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याने कोणत्याही महिन्यातील अमावस्या तिथीला नर्मदा नदीमध्ये स्नान करावे आणि चांदीपासून बनवलेल्या नागाची पूजा करून तो नाग नदीमध्ये प्रवाहित करावा. हा छोटा उपाय केल्यास कालसर्प दोषाची शांती होते तसेच दुष्प्रभाव कमी होतो.

2 - कोणत्याही मनुष्याच्या कुंडलीतील उग्र ग्रहाला शांत करण्याची शक्ती नर्मदा नदीमध्ये आहे. मंगळ, शनी, राहू, केतूचे दोष या नदीमध्ये स्नान केल्याने दूर होऊ शकतात. विशेषतः शनिश्चरी अमावास्येच्या दिवशी नर्मदा नदीमध्ये स्नान केल्यास सर्व बाधा दूर होतात.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, नर्मदा नदीमध्ये स्नान करण्याचे इतर लाभ...