हिंदू धर्मशास्त्रानुसार शुक्रवार धन आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री महालक्ष्मीच्या उपासनेचा विशेष दिवस आहे. तसेच अमावस्या (२७ जून) या दिवशी दरिद्रता रुपी अंधकार दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या उपासनेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. देवी लक्ष्मी वैभवाची अधिष्ठात्री आहे. समुद्र मंथनातून त्यांच्या प्रगट दिवसाची तिथी अमावस्या मानण्यात आली आहे. २७ जून देवी उपासनेचा शुक्रवार आणि अमवस्यासोबत जुळून आलेला हा योग इच्छापूर्तीसाठी शुभ आणि अचूक मानला जातो.
तुम्हालाही जीवनात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल किंवा नोकरी, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, कुटुंबात नेहमी कलह होत असेल तर २७ जून शुक्रवारी येथे सांगण्यात आलेल्या देवी लक्ष्मीच्या विशेष मंत्र उपायाने लक्ष्मी कृपा प्राप्त करू शकता...
(फोटो : देवी लक्ष्मी)