सामान्यतः प्रत्येक मुलगी पायात पैंजण घालते. स्त्रियांच्या अलंकारामधील पैंजण हा महत्त्वाचा दागिना आहे. विवाहित स्त्रिया तर हमखास पैंजण घालतात. या परंपरेमागे अनेक कारणे आहेत. पैंजणाला स्त्रियांच्या सोळा अलंकारामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. पायात पैंजण घातल्यामुळे कोणते फायदे होतात याविषयी फार कमी लोकांना माहिती असावी. येथे जाणून घ्या, या प्राचीन प्रथेमागे कोणकोणती कारणे सांगण्यात आली आहेत.