आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसंतांचा राष्ट्रधर्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भक्ती हा शब्द म्हटलं की, आपणास देव, देवपूजा, देवाची आराधना आणि स्वहितासाठी केलेली देवाची उपासना असे वाटते. आणि काही अंशी ते बरोबर असतेही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देवभक्तीला राष्ट्रभक्तीची सांगड घातली आणि उपासकाला स्वहिताकडून राष्ट्रहिताचा मार्ग दाखवला व राष्ट्रहिताच्या राष्ट्रीय भक्तीच्या मार्गावर मार्गस्थ केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धर्म सांगताना एका भजनात सांगतात,
तत्वाचा विचार, तोच खरा धर्म,
न्यायाचा व्यवहार, तोच खरा धर्म, 
सत्याचा आचार, तोच खरा धर्म,
करुणा आणि उपकार, तोच खरा धर्म
वर्म धर्माच्या समतेत नाही रे
धर्म पोरांचा पोरखेळ नाही रे
 
महाराजांनी धर्माची संकल्पना सांगताना विचार, व्यवहार, आचार, करुणा आणि उपकार हे कसे असावेत हे सांगितले. विचार, व्यवहार आणि आचार या तीन “र’ साठी जी विशेषणे महाराजांनी लावली, ती अत्यंत महत्त्वाची आहेत. त्याशिवाय धर्म फक्त वक्त्यांसाठी, लेखकांसाठी व कार्यकर्त्यांसाठी चर्चेतील शब्द राहील असं वाटते. राष्ट्रसंतांनी सांगितलेला धर्म म्हणजे खरा धर्म... राष्ट्रधर्म मनुष्य पद, प्रतिष्ठा आणि पैसा यासाठी तत्व, न्याय व सत्य हे विसरला की काय ? असे समाजात वावरताना जाणवत असते. धर्म, जात, पंथात अडकलेल्या माणसाला राष्ट्रधर्म सांगताना महाराज म्हणतात,
राष्ट्रधर्म ही मूलधर्म है, बाकी धर्म एकांग, उनका रक्षण करने खातीर, त्यजो और की भंग
माझा देश, माझा देव आहे, या देशाच्या देवाची भक्ती म्हणजे राष्ट्रभक्ती होय. राष्ट्रभक्ती शिकविणारा धर्म म्हणजेच राष्ट्रधर्म होय. राष्ट्रधर्म मानण्यासाठी आपली प्रत्येक कृती कशी असावी, याविषयी महाराज सांगतात,
सब मिलके प्रार्थना है, गुरुदेव से हमारी, सबका भला हो जगतमे, यही कामना हमारी
कटू बात तोड करके, व्यसनोको छोड करके हम राष्ट्रधर्म माने, लो वंदना हमारी
स्वहिताच्या पलीकडे जाऊन समाजहित आणि राष्ट्रहित यासाठी आपला आचार, विचार, प्रार्थना व कृती असणे गरजेचे आहे. महाराज एका भजनात म्हणतात,
प्रार्थितो संत साधूंना,
शक्ति द्या, बुद्धी द्या लोका
जाहला देश दुर्बल हा
लाज राखा न घ्या शंका
 
माणसात देव शोधणे गरजेचे आहे, आपल्यावर असलेली जबाबदारी प्रामाणिक पार पाडणे म्हणजे ते सुद्धा राष्ट्रधर्माचा भाग आहे. कर्तव्य अपारायण आणि निष्क्रिय नागरिकांना, तरुणांना उपदेश करताना राष्ट्रसंत म्हणतात,
बसलास कशाला, आळशी बनायला ? चाल पुढं देशाचं काम करायला चला, राष्ट्रधर्म आचारणात आणण्यासाठी राष्ट्रहितासाठी सुजाण नागरिक म्हणून क्रियाशील बनूया.
 
बातम्या आणखी आहेत...