आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhishamashtami Know Who Was Bhishma In Past Birth

पूर्वजन्मात कोण होते भीष्म, कोणासाठी केली होती आजीवन ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत एक प्राचीन ग्रंथ असून यामध्ये विविध नायक आहेत. त्यामधीलच एक नायक भीष्म पितामह हे आहेत. सर्वांना माहिती आहे की, पितामह भीष्म यांनी महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने युद्ध केले होते. परंतु फार कमी लोकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी माहिती असाव्यात. उदा. पूर्वजन्मात कोणत होते भीष्म पितामह, कोणाच्या शापामुळे त्यांना मनुष्य योनीत जन्म घ्यावा लागला. त्यांचे गुरु कोण होते आणि त्यांना गुरुसोबत युद्ध का करावे लागले?

भीष्म पितामह महाभारताच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंतच्या प्रत्येक घटनेतील एक नायक होते. त्यांनी आयुष्यभर केलेल्या प्रतिज्ञेचे पालन केले आणि हस्तिनापुरला सुरक्षित हातांमध्ये पाहूनच प्राणत्याग केला. आज (27 जानेवारी, मंगळवार) भीष्म अष्टमी आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी भीष्म पितामह यांनी प्राणत्याग केला होता. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भीष्म पितामह यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काही खास गोष्टी सांगत आहोत.

पूर्वजन्मात वसु होते भीष्म
महाभारताच्या आदी पर्वानुसार एकदा पृथु, वसु पत्नीसोबत मेरु पर्वतावर भ्रमण करत होते. तेथे विशिष्ठ ऋषींचा आश्रम होता. एका वसु पत्नीची दृष्टी वशिष्ठ आश्रमात बांधलेल्या नंदिनी नावाच्या गायीवर पडली. तिने ती गाय तिच्या द्यौ नावाच्या वसुला दाखवली आणि ती गाय आपल्याकडे असावी अशी मागणी केली.

पत्नीच्या इच्छापूर्तीसाठी द्यौने भावंडांच्या मदतीने त्या गायीचे हरण केले. वशिष्ठ ऋषी आश्रमात आल्यानंतर त्यांनी दिव्य दृष्टीने सर्व घटना जाणून घेतली आणि क्रोधामध्ये त्यांनी वसुंना मनुष्य योनीत जन्म घेण्याचा शाप दिला. त्यानंतर सर्व वसु वशिष्ठ ऋषींची माफी मागण्यासाठी त्यांच्याकडे आले.

तेव्हा वशिष्ठ ऋषींनी सांगितले की, तुम्ही सर्वजण लवकरच मनुष्य योनीतून मुक्त व्हाल परंतु या द्यौ नावाचा वसुला सर्व कर्माचे भोग भोगण्यासाठी दीर्घ काळापर्यंत पृथ्वीलोकात राहावे लागेल. महाभारतानुसार द्यौ नावाच्या वसुने गंगापुत्र भीष्म रुपात जन्म घेतला. शापाच्या प्रभावामुळे ते दीर्घकाळापर्यंत पृथ्वीवर राहिले आणि शेवटी इच्छामृत्युने प्राणत्याग केला.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
- कसा झाला भीष्म पितामह यांचा जन्म?

- भीष्म पितामह यांचे खरे नाव काय होते?

- भीष्म पितामह यांनी आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा का घेतली होती?

- का केले होते कशी नरेशच्या राजकन्यांचे हरण?

- भीष्माने कोणाला दिला होता युद्धात विजयी होण्याचा आशीर्वाद?

- श्रीकृष्ण का क्रोधीत झाले होते भीष्मावर?

- पांडवांना कोणी सांगितले होते भीष्म यांच्या मृत्यूचे रहस्य?

- युद्धात कसा झाला भीष्म पितामह यांचा पराभव?

- युधिष्ठिरला कोणी दिले होते धर्म ज्ञान ?

- कसा झाला पितामह भीष्म यांचा मृत्यू?