आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Budh Pradosh Tomorrow Know The Importance Of Fast

बुध प्रदोष आज : जाणून घ्या, या व्रताचे महत्त्व आणि संपूर्ण विधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म शास्त्रानुसार प्रत्येक मासातील त्रयोदशी तिथीला महादेवासाठी प्रदोष व्रत केले जाते. या महिन्यात हे व्रत 19 नोव्हेंबरला बुधवारी आहे. शास्त्रानुसार बुध प्रदोष व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. बुध प्रदोष व्रत पालनाचे शास्त्रोक्त विधान अशाप्रकारे आहे. एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून हे व्रत करून घेणे श्रेष्ठ राहते.

- पाणी न पिता प्रदोष व्रत करावे. सकाळी स्नान केल्यानंतर शंकर-पार्वती आणि नंदीला पंचामृत, गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर बेलाचे पान, गंध, फुल, अक्षता, अर्पण करून धूप-दीप लावून नावैद्य दाखवून पूजा करावी.

- संध्याकाळी पुन्हा स्नान करून अशाच प्रकारे महादेवाची पूजा करावी. महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

- आठ दिशांना आठ दिवे लावावेत. प्रत्येक दिवा लावल्यानंतर महादेवाला नमस्कार करावा. शिव स्तोत्र, मंत्राचा जप करावा. रात्री जागरण करावे.

- अशा प्रकारे सर्व इच्छापूर्ती आणि कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रदोष व्रताच्या धार्मिक विधानाचे नियम आणि संयमाने पालन करावे.