पति-पत्नीचे नोत हे विश्वासावर अवलंबून असते. पति-पत्नीमध्ये चांगला संवाद नसेल तर नाते टिकत नाही. कधी- कधी वैवाहिक जिवनात अशी परिस्थिती निर्माण होते की, पति-पत्नी परस्परांना शत्रू मानायला लागतात. अशी परिस्थिती का निमार्ण होते याबद्दल आचार्य चाणक्यांनी काही निती सांगितलेल्या आहेत.
आचार्य चाणक्य काय सांगतात...
लुब्धानां याचक: शत्रु: मूर्खाणां बोधको रिपु:।
जारस्त्रीणां पति: शत्रुश्चौराणां चंद्रमा रिपु:।।
या श्लोकामध्ये चाणक्यांणी सांगितले आहे की, जर एखाद्याची पत्नी वाम मार्गला लागली असेल किंवा चारित्र्यहीन असेल तर त्या महिलेचा सर्वात मोठा शत्रू तिचा पती ठरतो. वाममार्गाला लागलेल्या पत्नीला तिचा पति समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पतिने सल्ला दिलेला अशा पत्नीला आवडत नाही. ती त्याला आपला सर्वात मोठा शत्रू समजायला लागते. अशा वेळस जोडप्याचा संसार विस्कटतो. या परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्या नाही तर दोघेही वाममार्गाला लागतात. असे होऊ नये यासाठी दोघांनीही सावध पावित्रा घ्यायला हवा, असे चाणक्य सांगतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या या निती विषयी....