आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दररोज सकाळी या मंत्रांचा उच्चार केल्‍यास, घरात नांदेल सुख शांती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍याला असे अनेकदा दिसून येते की, काही व्यक्तींचे आर्थिक उत्पन्न चांगले असते, परंतू पारिवारिक जीवनात ते सुखी नसतात. शारीरिक किंवा इतर कारणांमुळे निर्माण झालेला तणाव त्यांना सुखापासून दूर ठेवतो.
जर तुम्हीही याच परिस्थितीतून जात असाल आणि तुम्हाला वाटत असेल की धनासोबत शांतीदेखील प्राप्त व्हावी तर यासाठी लक्ष्मी आणि विष्णूच्या उपासनेचा उपाय धर्मशास्त्रांत सांगितला आहे.
लक्ष्मी धन आणि ऐश्वर्याची देवता आहे. तसेच, विष्णूचे शांति आणि आनंद देणार्‍या देवाच्या रूपात पूजन केले जाते. म्हणूनच विष्णू आणि लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप आणि पूजेचा सरळ उपाय आहे. हा उपाय तुमच्या दोन्ही इच्छा पूर्ण करेल. खासकरून आषाढ़ महिन्यातील शुक्ल पक्षातल्या प्रत्येक दिवशी हा मंत्र जप मंगलकारी मानला जातो.
- दररोज सकाळी आंघोळीनंतर मंदीरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करावी.
- पूजेत विष्णूला गंध, अक्षता, पिवळ्या फुलांसोबत पिवळे वस्त्र आणि लक्ष्मीला लाल चंदन, लाल वस्त्र किंवा लाल पूजा सामग्री अर्पण करावी.
- पंजेरी (भाजलेले धणे, साखर आणि सुक्या खोबर्‍याचे मिश्रण), पंचामृत आणि डाळिंबाचा नैवैद्य दाखवावा.
- पूजेनंतर उत्तर दिशेला तोंड करून या मंत्राचा यथाशक्ति जप करावा-
"ॐ लक्ष्मीनारायणाय नम:"
- पूजा आणि जपानंतर तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची आरती करावी.
- शेवटी भगवान विष्णु आणि लक्ष्मी यांच्याकडे सुख-समृद्धि आणि शांतिची प्रार्थना करावी.